शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांनो सावधान, उद्यापासून प्लास्टिक बंदीवर ‘कटाक्ष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:42 IST

राज्यात आज २३ जून पासून प्लास्टिक बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीस सुरु वात होत

वसई : राज्यात आज २३ जून पासून प्लास्टिक बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीस सुरु वात होत असली तरी मात्र वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत येत्या दि.२५ जून सोमवार पासून या प्लँस्टिक बंदीची काटेकोर पणे अंमलबजावणी केली जाणार आहे.महापालिकेच्या हद्दीत पहिले दोन दिवस हे आवाहनाचे व प्लास्टिक गोळा करण्याचे असतील तर त्यांनतर सोमवार पासून कारवाई केली जाणार आहे. ती जबाबदारी स्वच्छता व आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची असणार आहे, अशी माहिती नवघर माणिकपूर आरोग्य विभागाचे प्रमुख जितेंद्र नाईक यांनी दिली.या संदर्भात वसई विरार पालिकेच्या स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त सुखदेव दरवेशी यांना या बंदी व कार्यपद्धतीबाबत कशा प्रकारे टीम नियुक्त केली आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क केला मात्र त्यांनी दिवसभरात दूरध्वनी उचललाच नाही.राज्य सरकारच्या या निर्णयानुसार बंदी विरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार असली तरी त्याची दाहकता म्हणजे एका व्यक्तीकडे पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास दहा हजार, आणि तिसºयांदा आढळल्यास २५ हजार रु पये दंड होणार आहे. त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिका नगरपंचायतींचे मुख्य अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.याबाबतचे आदेश पूर्वीच दिले गेले असले तरी परिणामकारक अंमलबजावणी केली जात नसल्याचे आढळून येत आहे. आता आज पासून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.सध्या तरी चहा कप, सरबत ग्लास, थर्माकोल प्लेट, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिके चे डब्बे, चमचे, पिशवी तसेच उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणाºया प्लास्टिकचा समावेश आहे.राज्यात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात पर्यावरण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या व ८ इंच बाय १२ इंच आकारापेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्र ी आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. तर पुढील टप्प्यात फ्लेक्स, बॅनर्स, तोरण, इत्यादी वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक आणि विक्र ी करण्यावरही बंदी घालण्याचा विचार सुरू आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी