शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीवर वाहनतळाचा उतारा

By admin | Updated: October 1, 2016 03:15 IST

वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे

तलासरी/ठाणे : वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे १४ एकर जागेवर २००० गाडया उभ्या राहू शकतील एवढया क्षमतेचे वाहनतळ सोमवारपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी दिली.दापचारी आणि आच्छाड येथील दुग्धविकास आणि आरटीओ यांच्या ४ जागांवर हे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याने ठाणे, कल्याण, भिवंडी बायपास, पालघर, वसई तसेच, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच, वाहतूक नियंत्रित करण्याकरिता मनोर फाटा व चिंचोटी येथे कंट्रोल रूम उभारण्यात यावे व त्यांच्या सूचनेनुसार गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करण्याच्या सूचना करीत वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे शिंदे म्हणाले. वरसोवा पुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ती टाळण्याकरीता झालेल्या बैठकीत विशेष वाहनतळ उभारण्यात येऊन जेएनपीटी व गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करून रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळावी अशी सूचना केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, पोलीस व वाहतूक पोलीस अधिकारी तहसीलदार, प्रांत आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तळावर स्वच्छ पाणी व अंघोळीची सोयवाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी संयुक्त पणे काम करण्याची गरज असून पोलिसांनी मनुष्यबळ वाढवावे याकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त मनुष्यबळ मिळावे, याकरिता त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले असून त्यांनी होकारही दिला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर उभारण्यात येणाऱ्या वाहनतळावर स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्थेबरोबर ड्रायव्हर यांना अंघोळीकरिता हौद बांधण्यात यावा. तसेच, रु ग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर देखील राबवण्यात यावे जेणे करून या वाहतूक कोंडीमुळे रु ग्णवाहिकांना कोणताही अडथळा होऊ नये असे त्यांनी सांगितले. गाड्या पास करणाऱ्या टोळ्यांची समस्याचारोटी, दापचारी, तलासरी येथील ग्रामस्थांनी चारोटी, दापचारी तपासणी नाका येथे मोठी वाहतूक कोंडी होते यावर उपाय योजना करण्याचे सांगितले. दापचरी तपासणी नाका येथे अवजड वाहने पास करणाऱ्या अनेक टोळ्या असून ग्रामस्थांना धमकावून या टोळ्या वाहने पास करतात याबाबत तक्रार केली. विशेष म्हणजे आर.टी.ओ, सदभावचे सुपरवायजर यांची हात मिळवणी असल्याचेही ते म्हणाले.पोलिसांवरील हल्ल्याचाही विषय मांडलातसेच या तपासणी नाक्यावर या टोळ्या दिवसरात्र घोळक्याने उभ्या असतात. याच्या कडून ग्रामस्थांना धमकवण्याचे प्रकार होतात तसेच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनात आणून देताच यावर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या तपासणी नाक्यावरील टोळ्या नेस्तनाबूत केल्यास दापचारी तलासरी भागात शांतता प्रस्थापित होईल असे ग्रामस्थांनी सांगितले.