भाईंदरमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याला कार चालकाने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 23:55 IST2025-06-30T23:55:40+5:302025-06-30T23:55:58+5:30

भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर येथील रामेश्वर बिल्डिंग मध्ये राहणार रमेश तुफानी जयस्वाल (वय ६५ वर्षे ) यांचा २ वर्षांचा नातु देवांश सचिन गुप्ता ह्याला ३० जून रोजी सायंकाळी खेळण्यासाठी इमारतीच्या खाली घेवुन गेले होते.

Two-year-old child crushed by car driver in Bhayander | भाईंदरमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याला कार चालकाने चिरडले

भाईंदरमध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याला कार चालकाने चिरडले

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका दोन वर्षाच्या बालकास गाडी चालकाने धडक दिल्याने त्यात बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर येथील रामेश्वर बिल्डिंग मध्ये राहणार रमेश तुफानी जयस्वाल (वय ६५ वर्षे ) यांचा २ वर्षांचा नातु देवांश सचिन गुप्ता ह्याला ३० जून रोजी सायंकाळी खेळण्यासाठी इमारतीच्या खाली घेवुन गेले होते.

बिल्डींमध्ये राहणारे ललित मदनलाल जैन (वय ४४ वर्षे) याने बिल्डिंगच्या आवारातील इनोव्हा क्रिस्टा गाडी क्र. एमएच ०४ जेबी ९६१३ ही चालु करुन रिव्हर्स पाठीमागे घेवुन बिल्डींगच्या बाहेर जाण्यासाठी वळवित असतांना देवांश यास समोरुन ठोकर दिली. देवांश ह्याच्या डोक्या वरून गाडीच्या पुढील डाव्या बाजुच्या चाक गेले. त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टर यांनी तपासून त्याचा आधीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. भाईंदर पोलीस ठाण्यात जैन विरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-year-old child crushed by car driver in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.