शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी दिला पित्याच्या पार्थिवाला अग्नी

By admin | Updated: April 22, 2016 01:49 IST

आपल्या आप्तस्वकियांसह आईवडीलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चितेला अग्नि देण्यासाठी महिलांना स्मशानभूमीत जाण्यास बंदी असताना पारंपारीक रितीरिवाज व रुढीना तिलांजली देऊन

पालघर : आपल्या आप्तस्वकियांसह आईवडीलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या चितेला अग्नि देण्यासाठी महिलांना स्मशानभूमीत जाण्यास बंदी असताना पारंपारीक रितीरिवाज व रुढीना तिलांजली देऊन सातपाटी येथील तीन मुलींनी आपल्या मृत वडीलांच्या चितेला अग्नी दिला. मच्छिमार समाजानेही या नव्या प्रथेचा मोठ्या मनाने स्वीकार केला.सातपाटी येथील मच्छीमार नंदकुमार आ. मेहेर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मच्छीमार समाजाने अंधश्रद्धा, हुंडापद्धतीला कधी स्थान दिले नव्हते. दिवसश्राद्ध पद्धतीत बदल, लग्न हळदी कार्यक्रमातील मटण-दारुची व्यवस्था इ. बाबत समाजातील संघटना नेहमीच पुढाकार घेऊन त्या प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेत होत्या. (प्रतिनिधी)मच्छीमार समाजाकडून पाठिंबाबुधवारी मेहेर यांच्या मृत्यूनंतर समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या चितेला अग्नी देण्याच्या वेळेस कविता, गौरी आणि जुईली या तीन मुलींनी ते कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मठ रुढी, परंपराना फारसे महत्व न देणाऱ्या मच्छीमार समाजाने त्यांना अनुमती दिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यास होकार दिला. त्यामुळे साश्रू नयनानी त्या तिन्ही मुलींनी आपल्या वडीलांच्या चितेला अग्नी दिला. सातपाटी गावामध्ये प्रथमच अशी घटना घडल्याने त्याची मोठी चर्चा सुरू होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण मच्छिमार समाजात उमटत आहेत.