मीरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना २०१७ साला प्रमाणेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 22:36 IST2025-09-04T22:35:21+5:302025-09-04T22:36:27+5:30

शहराची सध्याची लोकसांख्या हि अंदाजे ११ लाख ८२ हजारांच्या घरात असल्याचे मानले जाते. २०२१ ची जनगणनाच नसल्याने प्रभाग रचना हि जुन्या २०११ सालच्या ८ लाख ९ हजार ३७८ इतक्या जनगणनाचा आधार घेऊन केली आहे.

The ward structure of Mira Bhayandar Municipal Corporation is the same as in 2017. | मीरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना २०१७ साला प्रमाणेच 

मीरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना २०१७ साला प्रमाणेच 

लोकमत न्यूज नेटवर्क 
धीरज परब/मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २४ प्रभागांची प्रभाग रचना गुरुवारी जाहीर निर्णयात आली आहे. २०११ सालच्या जनगणने नुसार प्रभाग रचना असून पूर्वी प्रमाणेच ९५ नगरसेवक संख्या कायम आहे. प्रभागांची रचना देखील २०१७ च्या पालिका निवडणुकी नुसार तशीच आहे. हरकती सूचना साठी नागरिकांना १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. 

मीरा भाईंदर महापालिका नगरसेवकांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्या नंतर प्रशासकीय राजवट सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारी काळात तीन सदस्य प्रभाग रचना तयार केली होती. मात्र महायुती सरकार नंतर ती रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर जून २०२५ मध्ये राज्य शासनाने महापालिका निवडणूक घेण्याची कार्यवाही सुरु केली. मीरा भाईंदर महापालिकेत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षते खालील समितीने प्रारूप प्रभाग रचना बनवून ती शासनास व शासनाने राज्य निवडणूक आयोगास सादर केली होती. 

शहराची सध्याची लोकसांख्या हि अंदाजे ११ लाख ८२ हजारांच्या घरात असल्याचे मानले जाते. २०२१ ची जनगणनाच नसल्याने प्रभाग रचना हि जुन्या २०११ सालच्या ८ लाख ९ हजार ३७८ इतक्या जनगणनाचा आधार घेऊन केली आहे. नगरसेवकांची संख्या ९५ इतकी कायम आहे. एकूण २४ प्रभाग असून २३ प्रभागां मधून ४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. तर गेल्यावर्षी प्रमाणेच उत्तन - पाली परिसराचा प्रभाग २४ हा ३ नगरसेवकांचा असणार आहे. 

प्रारूप प्रभाग रचनेचा गुगल अर्थ नकाशा, प्रभाग निहाय चतुःसीमा, हद्दीतील परिसर आदींची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. पालिकेच्या मुख्य कार्यालय व ६ प्रभाग समिती कार्यालयात देखील हे प्रारूप प्रभाग रचना नकाशे, हद्दी व माहिती ठेवण्यात आली आहे. 

हरकती सूचना ऑनलाईन नाही 
जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या भौगोलिक सीमा, परिसर बाबत  हरकती व सूचना द्यायच्या असल्यास त्या कार्यालयीन वेळेत १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंतच्या मुदतीत द्याव्या लागतील. आयुक्तांच्या नावे मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयातील ३ ऱ्या मजल्या वरच्या निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत. ऑनलाईन, ईमेल वर केलेल्या हरकती व सूचना ह्या स्वीकारल्या जाणार नाहीत असे आयुक्तांनी जाहीर केले आहे. 

आरक्षण सोडत नंतर 
महापालिका निवडणुकीत ९५ पैकी ५० टक्के जागा ह्या महिलांसाठी राखीव असल्याने ४८ जागा महिलांसाठी असतील. या शिवाय ओबीसीची जनसंख्या मोजणी नसली तरी २७ टक्के प्रमाणे २६  जागा ह्या इत्तर मागास प्रवर्ग त्स्थत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जाती साठी ४ व अनुसूचित जमातीसाठी  १ जागा राखीव राहणार आहे. मात्र सदर आरक्षण प्रभागांची सोडत नंतर जाहीर होणार आहे.

Web Title: The ward structure of Mira Bhayandar Municipal Corporation is the same as in 2017.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.