शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वंचित महिलांच्या तालमींना आला वेग

By admin | Updated: March 24, 2017 00:57 IST

वंचित समूहांना त्यांच्या समस्यांना, त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने समता विचार प्रसारक संस्थेतर्फे

ठाणे : वंचित समूहांना त्यांच्या समस्यांना, त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दरवर्षी ‘वंचितांच्या रंगमंचा’चे आयोजन केले जाते. यंदा वंचित महिलांचा नाट्यजल्लोष रविवार, २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वा. टाउन हॉल येथील खुल्या रंगमंचावर सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील विविध वस्त्यांमधून गटबांधणीचे काम सुरू असून तालमींनाही वेग आला आहे. या वेळी ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर मीनाक्षी शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आतापर्यंत माजिवडा, मनोरमानगर, सावरकरनगर, नवशिवाई कम्पाउंड, लोकमान्यनगर, किसननगर असे गट तयार झाले आहेत. त्यांच्या नाटिकांचे विषय ठरून आता त्यांच्या तालमींनाही सुरुवात झाली आहे. या अनोख्या उपक्रमात १५ पासून ७५ पर्यंतच्या गरीब वस्त्यांमधील महिला सहभागी होणार असून त्यांच्या नाटकांच्या विषयांत या वर्गातील स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना आलेल्या अनुभवांचा समावेश आहे. हुंड्याची समस्या, नवऱ्याचा जाच, मुलीच्या जन्माचा आग्रह, परित्यक्ता स्त्रीची व्यथा, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण अशा महिलांना भिडणाऱ्या अनेक विषयांवर नाटिका सादर होणार आहेत. या कार्यक्र मासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, माजी महापौर संजय मोरे, विद्यमान पालिका सभागृह नेते नरेश म्हस्के, ज्येष्ठ रंगकर्मी मकरंद अनासपुरे, उदय सबनीस, विजू माने, अजेय संस्थेचे क्षितिज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लतिका सु.मो., जगदीश खैरालिया, हर्षलता कदम आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)