शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

परिवहन सेवेतील ताडी बहाद्दरन बस चालक, वाहक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:22 IST

लोकमताचा जबरदस्त दणका : ऑन ड्यूटी गेले होते ताडीच्या गुत्त्यावर, अनेकांची सुटली सवय

वसई : महापालिकेच्या परिवहन सेवेचे दोघे बस चालक आणि वाहक शनिवारी चक्क ऑन ड्यूटी नवापूर येथे गुत्त्यावर ताडी विकत घेण्यासाठी गेल्याचे सचित्र वृत्त दै.लोकमतने दि.३ जूनच्या सोमवारी अंकात प्रसिद्ध करताच त्या दोघांनाही प्रशासनाने तडकाफडकी निलंबीत केले आहे.

या घटनेची व दणकेबाज वृत्ताची गंभीर दखल घेत दोघा चालक व वाहकांच्या गैरवर्तनाबाबत वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवा म्हणून ठेका असलेल्या भगीरथ ट्रान्सपोर्ट कं.च्या चौकशी अधिकाऱ्यांनी या बसचालक व वाहकाला सेवेतून निलंबित केले आहे.बस चालक शकील जबरा तडवी बिल्ला क्र .१३६८६ रा.मोहराळे जि.जळगाव आणि बस वाहक महेश पांडुरंग भोये, बिल्ला क्र .१२८०२ रा.उटावली विक्रमगड, जि.पालघर अशी या दोघाची नावे आहेत.

शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास एमएच ०४ इके ११६६ या क्रमांकाची बस नवापूर नाक्यावर थांबली. त्यानंतर ताडी पार्सल घेण्यासाठी बसचे वाहक व चालक दोघेही गणवेशातच नजीकच्या ताडीच्या गुत्त्यावर पोहोचले, त्यांनी तेथून दोन बाटल्या ताडी घेतली आणि ते पुन्हा बसमध्ये परतले. खुले आम रस्त्यावरून चालत पिशवीत ताडीच्या बाटल्या घेऊन ते बसमध्ये चढले. विशेष म्हणजे विकत घेतलेल्या ताडीच्या बाटल्या चक्क बसमध्ये घेऊन ते चढले व पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवातही केली होती.

वसई परिवहनचे चालक,वाहक ‘ताडी’ पिऊन चालवतात बसेस

अखेर ही ताडीच या दोघांना नडली असून घडल्या प्रकारामुळे वसई-विरार शहर महापालिका परिवहन सेवेचे नाव बदनाम तर झाले मात्र नशीब बलवत्तर म्हणून कुठे अपघात झाला नाही, मात्र या दोघाना परिवहन सेवेकडून निलंबित केल्याचे पत्रच पालिका परिवहन चौकशी अधिकाºयाने सोमवारी काढले. यामुळे परिवहनमधील इतर ताडीबाजांचे धाबे दणाणले आहे.

परिवहनने कुठला धडा घेतला ?पालिकेचे चालक आणि वाहक मद्यपान करून आजही सर्रास गाड्या हाकतात तर अशा प्रवृत्तीवर कायम स्वरूपी कठोर कारवाईची आवश्यकता आहे. गंभीर म्हणजे दररोज कुठे न कुठे परिवहन सेवेचे चालक व वाहक हे खास करून ग्रामीण भागात बस थांबवून त्यामध्ये मद्यपानही करतात व त्याची वाहतूकही करतात, असे बरेच प्रकार प्रवाश्यांच्या तोंडून ऐकावयास मिळतात.मात्र एखादा फोटो अथवा व्हीडिओ वायरल झाल्यावरच महापालिका त्यांच्यावर कारवाई करते ही शोकांतिका आहे.