शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वसई पूर्व पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारी सूर्याची मुख्य जलवाहीनी गोखीवरे चिंचपाडा येथे फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 14:15 IST

१० ते १२ तास बंद राहणार पाणीपुरवठा

- आशिष राणे

वसई :वसई विरार शहर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनी बुधवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास वसई पुर्वेस  गोखीवरे चिंचपाडा येथे फुटून नादुरुस्त झाल्यानं येथील शहरांतील पाणीपुरवठा एन नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच विस्कळीत झाला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि ६ ऑक्टोबर रोजी सकाळी येथील वसई पूर्व पश्चिम विभागात मोडणाऱ्या नवघर माणिकपूर शहर,वसई गाव आणि नवघर पूर्व, डी प्रभागातील एव्हरशाईन,वसंत नगरी भागास पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची ( ७८८ )मि मी व्यासाची (एम एस)  पाईपलाईन बुधवारी सकाळी अचानकपणे वसई पूर्वेतील गोखीवरे चिंचपाडा येथे क्लासिक कंपनी समोर फुटल्याने शहरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्याने  लोकमत ला दिली.

आता तातडीने तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी हातीं न घेता हे काम गुरुवार दि ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं तसेच तिच्या दुरुस्ती साठी दिवसभर म्हणजेच १० ते १२  तास लागणार असल्याने शहरातील तिन्ही प्रभागातील  भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील सोबत जरी पाणी पुरवठा सुरू झाल्यावर देखील तो पुढील एक दिवस अनियमित आणि कमी दाबाने होईल, त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि वसई विरार  महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन नवघर माणिकपूर शहराच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. एकंदरीत च एन सणासुदीला दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याने नागरिकांनी नुसती चिंताच व्यक्त न करता नाराजीही ही व्यक्त केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार