शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आगाशी बाजारात सागरी सुकामेवा तेजीत

By admin | Updated: May 23, 2017 01:26 IST

समुद्रातील सुका मेवा अर्थात सुकविलेल्या मच्छीे विक्रीच्या गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून आगाशी येथील टेंभीपाडा येथे

शशी करपे लोकमत न्यूज नेटवर्कवसई : समुद्रातील सुका मेवा अर्थात सुकविलेल्या मच्छीे विक्रीच्या गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून आगाशी येथील टेंभीपाडा येथे भरत असलेल्या दर सोमवारच्या आठवडा बाजारात खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडू लागली आहे. सोमवारी तर खरेदीदारांच्या गर्दीने विक्रमच केला.आगारी, कोळी, आदिवासी, वाडवळ, कातकरी यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक समाजात पावसाळंयात सुकी मासळी साठवण करण्याची परंपरा आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यात अनेक ़भागात सुकी मासळीच्या बाजारपेठा आहेत. पण, विरारजवळील आगाशीतील टेंभीपाडा गावात दर सोमवारी भरणाऱ्या सुकी मासळीच्या बाजाराला वेगळेच महत्व आहे. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून हा बाजार नियमिते भरत असतो. पावसाळ््याचे चार महिने वगळता या बाजारात सुकी मासळीची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. बाजाराचे आणखी एक वैशिष्ट़य म्हणजे बाजारात फक्त आणि फक्त महिलाच सुकी मासळी विकण्याचा व्यवसाय करतात. सुकी मांदेली, बोंबील, करदी, सोडे, जवला आणि खारे याचा समावेश आहे. उत्तनसह वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी सुकी मासळीेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पावसाळ््यात मासेमारीला बंदी असल्याने मासळी मिळत नसल्याने स्थानिक भूमिपूत्रांसह शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर सुकी मासळी साठवून ठेवतात. दर सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून दुपारपर्यंत बाजार भरतो. त्यासाठी वसई तालुक्यातील मासे विक्रेत्या महिलांसह पालघर आणि डहाणू तालुक्यातील तसेच उत्तन परिसरातील महिलाही याठिकाणी भल्या पहाटे येत असतात. खरेदीदारांमध्ये फक्त वसई तालुक्यातील खवैय्यच येतात असे नाही तर ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, डहाणू इतकेच नव्हे तर गुजरातमधील वापीपासूनच्या ग्राहकांचा समावेश आहे. दर सोमवारी किमान वीस लाखांहून अधिकची उलाढाल होत असल्याची माहिती टेंभीपाड्याचे पोलीस पाटील शैलेश वैती यांनी दिली. या बाजाराने टेंभीपाड्यासह वसई तालुक्यातील हजारो मासेमारी कुटुंबांना मोठ्या रोजगार मिळवून दिला आहे, असेही वैती यांनी सांगितले. पावसाळ््याला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने गेल्या दोन सोमवारपासून बाजारात खरेदीदारांची झुंबड उडाली आहे. आजच्या बाजारात अल्लोट गर्दी पहावयास मिळाली. यंदाचे वैशिष्टय म्हणजे सुकी मासळीच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. पहाटेपासून दुपारपर्यंत रस्त्यावर उभे राहून किमान हजारभर महिला व्यवसाय करतात. तर खरेदीदारांची संख्या दुप्पट असते. बाजार कर वसूल केला जात असतांना याठिकाणी साधी प्रसाधन गृह नाही. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.