शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात भात लावणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:10 IST

मजुरांची टंचाई : शेतीसाठी मजूर शोधून आणण्याची आली वेळ

पारोळ : वसई तालुक्यात भात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. सध्या भात लावणी जोरात असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी भात लावणी करत आहेत. तर काही शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत. मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यात शेतकऱ्यांनी निरनिराळ्या प्रकारचे भात बियाणे खरेदी केले असून चांगल्या प्रकारे रोपे तयार झाल्याने भात लावणीस सुरुवात झाली आहे. वसई तालुक्यात भाताचे पीक सर्वात जास्त घेतले जाते. नांगरणी करून भात लावणी सुरू आहे. यंदा भाताचे बियाणे, खते तसेच मजुरांचे दर वाढल्याने शेतीचा खर्चही आवाक्याबाहेर गेल्याचे शेतकरी सांगतात. शेतीचा खर्च भरून येत नसल्याने काही शेतकºयांकडून दोन वेळच्या जेवणासह सर्व व्यवस्था केली जाते. त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची टंचाई दूर होते. सध्या शेतकरी आपल्या कुटुंबासह भातलागवडीत मग्न झाला आहे. अनेक शेतकºयांनी जनावरे विकल्याने अनेकांना नांगरजोडी मिळत नाही. त्यामुळे भात लावणी करण्यास त्यांना वेळ लागतो. परिणामी, अनेक जण नांगरणी करण्यासाठी पॉवर टिलरचा उपयोग करतात.पूर्वी वसई तालुक्यात भात लावणीसाठी नाशिक येथील मजूर असायचे. मजुरीचा दर आणि किती दिवस काम या बोलीवर त्यांना भात लावणीसाठी आणले जाई. त्यांची मजुरी महागल्याने, डहाणू तालुक्यातील मजूर आणले जात. मात्र, ते वापी येथे नोकरीला जाऊ लागल्याने वसईत लावणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली. मजूर मिळेनासे झाले. त्यामुळे मजुरीच्या दरात वाढ झाली असून त्यांना सध्या २५० ते ३०० दिले जातात.