शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू नगरपरिषदेत घनकचरा कामगारांचा ठिय्या; कामगारांना दोन महिने पगारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 00:05 IST

श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन 

डहाणू : डहाणू नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बिले मिळालेली नाहीत. परिणामी साफसफाई करणाऱ्या कामगारांना मजुरी न मिळाल्याने संतप्त कामगारांनी सोमवारी काम बंद करून डहाणू नगर परिषदेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

डहाणू नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी नगरपरिषदेने ठेकेदाराला वार्षिक ठेका दिला आहे. ठेकेदाराकडे साफसफाई करण्यासाठी ५४ कामगार आहेत. मात्र ठेकेदाराकडून मागील दोन महिन्यांपासून सफाई कामगारांना वेतन अदा करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर असाच प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी कामगारांनी शहरातील घाण, कचरा, गोळा न करता काम बंद आंदोलन केले होते. यावेळी पुन्हा कामगारांचे वेतन रखडल्याने थेट  डहाणू नगरपरिषदेचे कार्यालयात ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला.

कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू असल्यामुळे नगरपरिषद कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या लोकांचे दिवसभर हाल झाले. कामगारांना न्याय न मिळाल्यास संघटनेचे नेते विवेक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सचिव दिनेश पवार यांनी दिला आहे.

...अन्यथा तीव्र लढा डहाणू नगर परिषदेमध्ये काम करीत असलेल्या या सफाई  कामगारांना न्याय मिळाला नाही, तर संघटनेचे नेते विवेक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार