शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

एस.टी.ला. अपघात, चालकासह ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:34 PM

बसच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर; ट्रकने दिली जबरदस्त टक्कर

बोईसर : मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºाा बोईसर-चिल्हार रस्त्यावर आज सकाळी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण टक्करीमध्ये बस चालकासह बसमधून प्रवास करणारे पाच प्रवासी जखमी झाले होते. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. मात्र या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून वाहनांच्या तीन ते चार कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या.या अपघातात बसचालक उध्दव कंठाले यांच्या दोन्ही गुडघ्याला मार लागला होता त्यांना उपचारासाठी नागझरी येथील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर बसमधील प्रवासी ज्ञानदेव आबाळे व शैला आबाळे, अतळापूर, ता.संगमनेर हे पती-पत्नी तर सुंगधाबाई हापाळे, बदगी- बेलापूर, ता.अकोले, दिगू पंडित, दांडीपाडा, बोईसर व धनंजय पाटील, काटकर पाडा, बोईसर या सर्व जखमींवर बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सर्वांना घरी पाठविले आहे.बुधवारी (दि.१९) सकाळी ८ वाजता बोईसर आगरातून अहमदनगरकडे जाणारी (एमएच २०, बीएल २८८३) बस गुंदले गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंड उतरून सेंट फ्रान्सिस स्कूलसमोर सव्वा आठच्या सुमारास आली असता बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यावेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेच्या नाल्यात जाऊन चालकासह ५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.या अपघातात बसच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचूर झाला तर ट्रकचे बॉनेट व दरवाजा तुटून डिझेल टाकी फुटली.अपघात झाल्यानंतर पालघर विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी आशीष चौधरी, बोईसर एस.टी.डेपोचे व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर, बोईसर स्थानक प्रमुख दिनकर राठोड इत्यादी अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपचार मिळावे म्हणून प्रयत्न केले त्या नंतर प्रत्येक जखमी ना रू.५०० ची मदत देऊन पुढील उपचारासाठी टी-फॉर्म दिला.बोईसर-चिल्हार हा रस्ता मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडत असल्याने या महत्त्वाच्या रस्त्यावरून दिवस-रात्र प्रचंड अवजड वाहतूक होत असून या रस्त्याचे मागील २ वर्षापासून काम सुरू आहे. या रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात होऊन शेकडो जणांचा जीव गेला असून अजून किती बळी घेणार असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात