शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे सहा अधिकारी दोषीमुक्त

By admin | Updated: October 15, 2016 06:26 IST

वसई विरार पालिकेच्या तब्बल सहा अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीत निर्दोष ठरवण्यात आले असून तीन जणांना अंशत: दोषी ठरवण्यात आले आहे.

शशी करपे / वसईवसई विरार पालिकेच्या तब्बल सहा अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीत निर्दोष ठरवण्यात आले असून तीन जणांना अंशत: दोषी ठरवण्यात आले आहे. अनधिकृत बांधकाम आणि गैरव्यवहारप्रकरणी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती. तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुरेश थोरात यांच्यावर अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याचा ठपका ठेऊन ३१ आॅगस्ट २०१५ रोजी निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी थोरात यांची विभागी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारचे सेवानिवृत्त अवर सचिव ज. न. पिंपळे यांना नेमण्यात आले होते. पिंपळे यांनी आपल्या अहवालात थोरात यांना अंशत: दोषी ठरवले आहे. मात्र, चौकशी अधिकाऱ्यांना शिक्षेसंबंधी कोणतेही अधिकार नसल्याने त्यांनी आपले मत नोेंदवलेले नाही. सेवानिवृत्ती वरिष्ठ लिपीक निंबा पाटील यांना कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा दाखवल्याचा ठपका ठेऊन ३ सप्टेंबर २०१५ रोजी निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी पाटील यांची विभागी चौकशी पिंपळे यांनीच केली. पिंपळे यांनी आपल अहवालात पाटील यांना निर्दोष ठरवले आहे. २९फेब्रुवारी २०१६ रोजी पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. नालासोपारा विभागारतील पाणी पुरवठा खात्यातील लिपीक विजय पाटील यांना अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण ठेवण्यात निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेऊन ३१ आॅगस्ट २०१५ रोजी निलंबित करण्यात आले होते. पाटील यांचीही विभागी चौकशी पिंपळे यांनी केली. पिंपळे यांनी आपल्या अहवालात पाटील यांना अंशत: दोषी ठरवले आहे. नालासोपारा विभागातील अतिक्रमण खात्याचे वरिष्ठ लिपीक अरविंद नाईक यांना अनधिकृत बांधकामे आणि नळजोडण्यांवर कारवाई करण्यास दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन ३१ आॅगस्ट २०१६ रोजी निलंबित करण्यात आले होते. नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी पिंपळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पिंपळे यांनी आपल्या अहवालात नाईक यांना अंशत: दोषी ठरवले आहे. प्रभाग समिती क चे लिपीक नरेंद्र जगताप यांच्यावर अनधिकृत बांधकामांसह चार दोषारोप ठेऊन त्यांची विभागी चौकशी करण्यात आली. २ जानेवारी २०१४ रोजी सेवानिवृत्त सहसचिव प्र. मा. माळवदकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली होती. चौकशी सुरु असताना याप्रकरणात दोन सादरकर्ते अधिकारी निलंबित झाल्यामुळे चौकशी रखडली होती. शेवटी चारही प्रकरणात जगताप यांना क्लिन चीट मिळाली आहे.