शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चाराेटी टाेलनाक्यावर लागत आहेत वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:43 IST

फास्टॅग यंत्रणा फेल : चालकांचे कर्मचाऱ्यांसाेबत खटके, प्रशासनाचा गलथान कारभार

शशिकांत ठाकूर लोकमत न्यूज नेटवर्क कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी टोलनाक्यावर फास्टॅग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे टोलनाक्यावर दररोज वाहनाच्या लांबलचक रांगा लागत आहेत. फास्टॅग प्रणाली लागू केल्यानंतरही परिस्थिती बदलली नसल्याने या याेजनेचा उद्देशच सफल न झाल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.१६ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात फास्टॅग वापरणे सर्वच वाहनांना बंधनकारक केले आहे. फास्टॅग प्रणाली येण्याच्या  आधी कित्येक वर्षांपासून टोलनाक्यावर रोखीने व्यवहार होत होते. त्यामुळे बराच वेळ वाया जात हाेता. तसेच, सुट्या पैशांवरून वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांत वाद होत हाेता. त्यामुळे टोलनाक्यावर गर्दी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि वाहनांचे इंधन वाया जात होते. यावर उपाय म्हणून फास्टॅग प्रणालीची यंत्रणा लागू केली. फास्टॅगद्वारे  टोलनाक्यांवरील रांगांतून लवकर मुक्ती मिळेल,  असा सरकारने  दावा केला होता. फास्टॅग नसेल तर वाहनचालकांना टोलची दुप्पट  रक्कम भरावी लागत आहे. ही सक्ती सुरू झाल्यानंतर साेमवारी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर चारोटी टोलनाक्यावर सकाळी मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर व संध्याकाळी गुजरात-मुंबई मार्गिकेवर  वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. चारोटी टोलनाक्यावर फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने टोल कर्मचारी टोलची दुप्पट रक्कम भरायला सांगतात. त्यामुळे वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. बऱ्याचदा फास्टॅग स्टिकर स्कॅन न झाल्याने रोखीने टोल भरल्यानंतर काही वेळाने टोलची रक्कम फास्टॅगमधून वसूल केल्याचाही  मेसेज वाहनचालकांना येत आहे. त्यामुळे फास्टॅगचा वाहनचालकांनी धसकाच घेतला आहे.

वाहनचालकांकडून दुप्पट-तिप्पट वसुली nदुप्पट टोल आणि पुन्हा फास्टॅगमधूनही टोलवसुली असा तिप्पट टोल भरावा लागत आहे. अशा त्रुटींमुळे आज टोलनाक्यावर दोन ते तीन किमी रांगा लागल्या हाेत्या. त्यामुळे वाहनचालकांनी विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून मार्ग काढला. nया वाहनांच्या गर्दीचा फटका वाहनचालकांबरोबर मोटारसायकलस्वार, रिक्षाचालक व रुग्णवाहिकेलाही बसला  आहे.  बऱ्याचवेळा एक दोन-टोल वसुली मार्गिका बंद असतात. मात्र, टोलचा ठेका असलेली आयआरबी कंपनी या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे. nया समस्यांवर आयआरबी कंपनीने तोडगा काढून होणारी गर्दी टाळावी व वाहनचालकांना होणारा मनस्ताप दूर करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाका