शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात जवखेड हत्याकांडाप्रकरणाचा एक दिवसीय उपोषणाने निषेध

By admin | Updated: November 13, 2014 19:14 IST

या उपोषणाबद्दल डॉ. निरज हातेकर यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की, शहरी भागातील लोक अशा गंभीर घटनांबद्दल अनभिज्ञ असतात

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - जवखेड हत्याकांड प्रकरणाला २० हून अधिक दिवस झाले तरीही गुन्हेगार अद्याप मोकाट आहेत. जातीय हत्याकांडाचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवार (दि. १३ ) रोजी मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एक दिवस उपोषण करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. या उपोषणाबद्दल डॉ. निरज हातेकर यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की, शहरी भागातील लोक अशा गंभीर घटनांबद्दल अनभिज्ञ असतात. मुंबई सारख्या शहरातील किमान एक टक्का लोकांनी जरी या घटनेचा निषेध केला तरी याबाबात जागरुकता झाली असे म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे, जर्मन विभागाच्या प्रा. डॉ. विभा सुराणा यांनी असं म्हटलं की, आज अनेक विद्यार्थ्यांना अशा घटांचे गांभीर्य लक्षात येत नाही. 'Class room should not be a glass room' असं म्हणत त्यांनी वास्तवाची जाण करुन देणं म्हणजेच खरं शिक्षण आहे, म्हणूनच त्या आपल्या विद्यार्थ्यांसह या उपोषणात सहभागी झाल्या. 
डॉ. राजन पडवळ यांनी असे सांगितले की, आज मागासवर्गातील अनेक लोक प्रगती करत आहेत. त्यांची प्रगती बघून काही जातीवादी लोकांना पोटशुळ होतो त्यामुळे अशा घटना घडतात. या आंदोलनात मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांच्यासह महारुद्र शिरसाट, किरण सावंत, डॉ. सविता कुलकर्णी, अमेय जाधव, मिहीर कुलकर्णी, श्रेया पटवर्धन आणि उर्मी रानडे यांचा सहभाग होता.