शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीत डीजेच्या कानळ्या

By admin | Updated: October 13, 2016 03:19 IST

या वर्षी दसरा मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठला गेल्याने उत्सवाला गालबोट लागले आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दसरा मिरवणुकीत डिजेचा अनिर्बंध वापरावर आळा

डहाणू/बोर्डी : या वर्षी दसरा मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठला गेल्याने उत्सवाला गालबोट लागले आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दसरा मिरवणुकीत डिजेचा अनिर्बंध वापरावर आळा घालण्यात प्रशासन हतबल ठरले आहे. दरम्यान उत्सवकाळात जिल्हयातील पोलीस यंत्रणेला हाताळण्यात पोलीस अधीक्षक शारदा राऊत अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गणेशोत्सव मिरवणुकीत आवाज वाढीव डीजे तुला आईची शपथ हाय...म्हणून, तर दसरा मिरवणुकीत डॉल्बीवाल्या बोलव माङया डिजेला अशा आरोळ्या रात्री उशिरापर्यंत देऊन उत्सव काळात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठला गेला. या कांठळ्या बसविणाऱ्या आवाजाने रंगाचा बेरंग केला. विविध धार्मिक सण-उत्सव साजरे करताना संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याची परवानगी घेतली जाते. तर उत्सवाच्या अनुषंगाने पोलिसांकडूनही गावागावात नागरिकांच्या बैठका घेतल्या जातात. या वेळी उत्सव काळात घ्यावयाची काळजी आणि जबाबदाऱ्या या विषयी सूचना दिल्या जातात. उत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळांकडून विविध नियम पाळण्याविषयी लिखित हमी घेतली जाते. मात्र मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करून मंडळांनी नियमांना केराची टोपली दाखवली. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उत्सवापुर्वी गावपातळीवर पोलीस-नागरिक समन्वयाच्या सभांना पोलिसांकडूनच हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील मिरवणुकी प्रमाणेच मंगळवारी दसरा मिरवणुकी दरम्यान रात्री उशिरापर्यंत कांठळ्या बसविणाऱ्या डिजेच्या आवाजाने नागरिकांना बेहाल केले. (वार्ताहर)