शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या दिमतीला खाजगी कार

By admin | Updated: March 14, 2016 01:33 IST

वसई -विरार महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीसाठी भाडे तत्वावर गाड्या घेताना टी परमिटच्या गाड्या न घेता खाजगी गाड्या घेत असल्याने परिवहन खात्याचा वर्षाला

शशी करपे,  वसईवसई -विरार महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिमतीसाठी भाडे तत्वावर गाड्या घेताना टी परमिटच्या गाड्या न घेता खाजगी गाड्या घेत असल्याने परिवहन खात्याचा वर्षाला किमान सात लाखाचा कर बुडत असून हा प्रकार गेल्या सहा वर्षांपासून सुुरु असल्याची धक्कादायक माहिती लोकमतच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात निविदा न काढताच ठेकेदारांना मुदतवाढ दिल्याची माहितीही हाती आली आहे. महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात ठेका न काढताच जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देऊन एकूण ३८ गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. यामध्ये १६ बोलेरो, १७ मारुती स्विफ्ट, चार तवेरा आणि एक इनोव्हा यांचा समावेश आहे. यातील इनोव्हा गाडी आयुक्तांसाठी आहे. बोलेरो गाडयांसाठी महिन्याला ४७ हजार रुपये, मारुती स्विफ्टसाठी महिन्याला ३८ हजार रुपये, तवेरासाठी महिन्याला ५६ हजार रुपये आणि इनोव्हासाठी महिन्याला ६७ हजार रुपये भाडे दिले जाते. या ३८ गाड्यांसाठी पालिका दरवर्षी १ कोटी ९५ लाख ३१ हजार रुपये भाडे अदा करते. आता पुढील वर्षांसाठी पहिल्यांदाच तीन वर्षांनी निविदा मागवण्यात आल्या आहेत. वसई विरार पालिकेची स्थापना होऊन सातवे वर्ष सुरु आहे. दरवर्षी पालिका भाड्याने गाड्या घेत असते. पण, पालिकेकडून खाजगी गाड्या भाडे तत्वावर घेताना ठेकेदाराकडून टी परमिटच्या गाड्या पुरवल्या जात नसतांनाही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. दुसरीकडे, प्रवासी वाहतूकीचा संशय असल्याने खाजगी गाड्यांची वारंवार तपासणी करणाऱ्या आरटीओकडूनही डोळेझाक केली जात असल्याचे उजेडात आले आहे. खाजगी गाड्यांच्या भाड्यापोटी पालिकेने ठेकेदारांना गेल्या पाच वर्षांत अंदाजे नऊ कोटींच्या घरात पैसे दिले आहेत. तर खाजगी गाड्यांचा व्यावसायिक वापर करून नऊ कोटी रुपये कमावणाऱ्या ठेकेदारांनी टी परमिट न घेतल्याने परिवहन खात्याचा सुमारे तीस लाखाच्या आसपास कर बुडवला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कायदा कलम ६६ (१), १९२ (अ) अन्वये प्रवासी वाहतूक परवाना न घेता वैयक्तिक वाहनांमधून वाहतूक करून व्यवसाय केला जात असल्यास तो दंडनिय अपराध आहे. असे असताना वाहतूक विभागाकडून आतापर्यंत कधीही कारवाई करण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. १वैयक्तिक वाहनांचा अपघात होऊन त्यात जिवीतहानी झाल्यास विम्याचा कोणताही लाभ मिळत नाही. टी परमिट गाड्यांचा अपघात झाल्यास आर्थिक लाभ मिळतो. या गंभीर बाबीकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी गाड्या देण्यात आल्या आहेत. काही अधिकारी आणि सर्वच पदाधिकारी स्वत:च्या गाड्या वापरतात. त्याबदल्यात त्यांना वाहन भत्यापोटी दरमहा ३५ हजार रुपये दिले जातात. २महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार, भाडे तत्वावर गाड्या पुरवताना संबंधित व्यक्तीने टी परमिट अर्थात प्रवासी वाहतूक परवाना घेणे बंधनकारक आहे. वैयक्तीक वापरासाठी स्वत: गाडी विकत घेतल्यास या परवान्याची गरज नसते. पण, गाड्ी भाड्याने देऊन व्यवसय केला जात असल्याने त्यांच्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यानुसार टी परमिट घेणे बंधनकारक असते.३ यातून परिवहन खाते दरवर्षी अशा चारचाकी वाहनांकडून किमान पंधरा ते वीस हजार रुपये कर वसूल करीत असते. पण,पालिकेच्या ताफ्यात ठेकेदारांनी टी परमिटशिवायच खाजगी गाड्या पुरवून परिवहन खात्याचा लाखो रुपयांचा कर बुडवला असून पालिका अधिकारी आणि आरटीओकडून कोणतीच कारवाई केली नसल्याचे उजेडात आले आहे.