शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

वसईत ११४ संशयित डेंग्यू रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 11:15 PM

१० महिन्यांची आकडेवारी : तर मलेरिया रुग्णांची संख्या ५० वर

मंगेश कराळे 

नालासोपारा : वसई तालुक्यात कचऱ्यामुळे मलेरिया आणि डेंगूचा प्रसार होत असून मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आरोग्य विभाग कीटकनाशके आणि औषधांवर कोट्यवधी रूपये खर्च करत असून हा खर्च कागदावर दाखवण्यापुरताच मर्यादित आहे का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई - विरार मनपाच्या काही प्रभागात घाणीचे साम्राज्य, कचºयाचे ढीग आणि दुर्गंधी यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचे रु ग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मनपा तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची रांग लागलेली आहे. जानेवारी २०१९ ते ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत ११४ संशयित डेंग्यू तर मलेरियाचे ५० रु ग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय आरोग अधिकारी डॉ. तबस्सुम काझी यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. शहरातील कचरा आणि डासांची संख्या काही कमी झालेली नाही. दरम्यान, विरारच्या सहकार नगरमधील एकाच परिवाराच्या चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचेही कळते.मनपा हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण याची संख्या हजारोंच्या घरात असल्याची माहिती एका डॉक्टर अधिकाºयाने नाव न सांगण्याचा अटीवर दिली. खाजगी क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाने आदेश काढून डेंग्यू, मलेरिया रुग्णाची माहिती देण्यासाठी आदेश काढले पाहिजे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.डेंग्यूच्या कचाट्यात पोलीस : वालीव पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना डेंग्यूची लागण झाली होती. गोपनीय विभागातील पोलीस हवालदार रवी पवार, बाफाने चौकी येथील पोलीस नाईक घुगे आणि पोलीस कर्मचारी सोनवणे यांच्या मुलीला डेंग्यूची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना उपचारासाठी ग्लोबल, प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तुळींज पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आणि अधिकाºयालाही डेंग्यूची लागण झाल्याचे समजते.कीटकनाशके आणि औषधांची फवारणी महानगरपालिकेकडून करण्यात येत नसल्यामुळे ही रोगराई आणि डासांची संख्या वाढली आहे.- मनीषा वाडकर, संतप्त नागरिकमनपा रुग्णालयातील ओपीडीमध्ये आलेल्या पेशंटच्या नोंदीवरून आरोग्य विभाग माहिती देते. कोणीही काही सांगितले तरी तो आकडा ग्राह्य धरला जात नाही. - बळीराम पवार, आयुक्त, वसई मनपा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार