शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

लोकसभा निवडणुकीत नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील मतदानही महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 3:07 AM

गेल्या विधानसभा निवडणकित महाराष्ट्राच्या राजकारणात तीन आमदार निवडून आणत पाचव्या क्रमांकावर आलेला बविआ पक्ष चर्चेत राहिला.

- मनिष म्हात्रेगेल्या विधानसभा निवडणकित महाराष्ट्राच्या राजकारणात तीन आमदार निवडून आणत पाचव्या क्रमांकावर आलेला बविआ पक्ष चर्चेत राहिला. पालघर लोकसभा निवडणुकीत काय डावपेच आखते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बविआचे पालघर जिल्ह्यात तीन आमदार आहेत. यात नालासोपारा विधानसभा क्षेत्रात सलग दोनवेळा युवा आमदार क्षितिज ठाकुर भरघोस मताधिक्क्याने निवडून आले आहेत. ते बविआचे सर्वेसर्वा अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीत नालासोपारा येथील उत्तर भारतीय मतदारांचे मतदानही महत्वाचे असल्यामूळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी सोबत नालासोपारा येथे जाहीर सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला होता. नालासोपारा बालेकिल्ला असलेल्या बविआनेही सुपरस्टार दिनेशलाल यादवला बोलवत आपल्या प्रचारात रंगत आणली होती.२०१८ च्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेवर मात केली असली तरी मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेनेची अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. वसई आणि नालासोपारा या मतदारसंघांवरच अवलंबून राहणाऱ्या बहुजन विकास आघाडीला अन्य विधानसभा मतदारसंघांत मात्र फारशी मते मिळाली नाहीत. पालघर लोकसभा मतदारसंघात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, डहाणू, विक्र मगड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. वसई, नालासोपारा आणि वसई शहराचा अर्धा भाग मिळून तयार झालेल्या बोईसर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार असून महापालिकेत एकहाती सत्ता, तर ग्रामपंचायत व पंचायत समिती त्यांच्या ताब्यात आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत वसई विधानसभेत ४८ आणि नालासोपारा मतदारसंघात केवळ ३४ टक्के मतदान झाले होते. वसई, नालासोपारा आणि बोईसरवर वर्चस्व असणाऱ्या बहुजन विकास आघाडीला या मतदारसंघांकडून आशा होत्या, परंतु वसईतून ४८ टक्के आणि नालासोपारा मतदारसंघातून ३४ टक्के मतदान झाल्याने नक्की गणित कुठे चुकले होते ते या निवडणूकित बविआला शोधावे लागणार आहे. बविआला वसईतून ६४ हजार ४७८ तर नालासोपारा मतदारसंघातून ७९ हजार १३४ मते मिळाली. याच दोन्ही मतदारसंघांतून बविआला सुमारे दीड लाख मते मिळाली होती. त्यामुळे बविआ थेट तिसºया क्र मांकावर फेकला गेला.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत भलेभले रथीमहारथी वाहून गेले. भाजप-शिवसेना युती असली तरी मोदी लाटेचा फायदा भाजपला झाला होता, तरीही बहुजन विकास आघाडीला वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून चांगली मते मिळाली होती. २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. तर काँग्रेसने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मतदानाची टक्केवारी ६२ टक्के होती. २०१८ ला हे प्रमाण अवघे ५१ टक्के होते. बहुजन विकास आघाडीला नालासोपारा आणि वसईतून मागच्या वेळेपेक्षा कमी मतदान झाल्याने ते तिसºया क्र मांकावर फेकले गेले. नालासोपारा विधानसभा क्षेत्रातून भाजपाला ३७६२३ मते, शिवसेनेला २७२६५, बविआला ७९१३४, माकप ७८६ व कॉग्रेसला ३६६२ मते मिळाली होती.पालिकेच्या माध्यमातून नालासोपारा विधानसभा क्षेत्रात अनेक कामे झाली आहेत. नुकताच सर्वांसाठी मोफत औषधोपचार सेवा पालिका रूग्णालयात सुरू करण्यात आली आहे. मिळेल त्याला नळपाणी जोडणी, शहरात सिग्नल यंत्रणा, भूमिगत गटारे, तलाव सुशोभीकरण, चांगले रस्ते, पालिकेची परिवहन सेवा, विरार येथे होत असलेले प्रशस्त क्रीडा संकूल, महिला बालकल्याण मार्फत विविध योजना, अग्निशमन सेवा, बौद्ध स्तूप संवर्धन आदी उपक्रम सुरू आहेत. मात्र विरोधकांकडून कामे होत नसल्याची ओरड कायम केली जात आहे.शिवसेनेचे नालासोपाºयात मोठे संघटनात्मक जाळे असून शिवसैनिकांनी अपार परिश्रम या निवडणुकीत घेतले. लोकसभेत नालासोपारा मतदारसंघातून लाखाच्या पुढे मते मिळविणाºया भाजपची त्यावेळी निराशा झाली. तर लोकसभेत ७१ हजार मते मिळविणाºया बविआने या निवडणुकीत दणदणीत मते मिळवत ५४ हजार मतांची आघाडी घेतली. बविआने गाफील न राहता काम केले तर सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना अतिउत्साहाचा फटका बसला.दृष्टिक्षेपात राजकारणनालासोपारा विधानसभा मतदारसंघातून आमदार क्षितीज ठाकूर यांनी २०१४ ला दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. विशेष म्हणजे २००९ पेक्षा अधिक मताधिक्य त्यांनी मिळवले होते. या मतदारसंघात चुरस होईल असे वाटत असताना तब्बल ५४ हजार मतांनी त्यांनी विजयश्री मिळवली होती. क्षितीज ठाकूर (बविआ) यांना ११३५६६ मते तर राजन नाईक (भाजप) यांना ५९०६७ मते मिळाली होती.लोकसभा निवडणुकीत नालासोपारा-विरारमधून भाजपला जवळपास ३४ हजार मतांची आघाडी मिळाली होती. ठाकूरांचा बालेकिल्ला असलेल्या विरारमधूनच भाजपला भरभरून मतदान झाल्याने बविआचे नेते व कार्यकर्ते त्यानंतर खडबडून जागे झाले होते. विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचे पडसाद उमटू नये म्हणून बविआच्या कार्यकर्त्यांनी आपली सगळी ताकद झोकून दिली होती.गुजराती, मारवाडी, उत्तरभारतीय मते परत भाजपला जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. एलबीटीचा फटका बसू नये म्हणून व्यापाºयांनाही विश्वासात घेतले. शिवसेना व भाजपची युती तुटल्याने निवडणूक जिंकणार असे दिसत असले तरी बविआ गाफील राहिली नाही.राजकीय घडामोडीपालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय कॉग्रेस सरकारने दिल्यावर पालिकेने उच्च न्यायालयात धाव घेत त्यावर स्थगीती मिळवली.अजुनही हा प्रश्न प्रलंबीत आहे.ग्रामीण जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेली एसटी सेवा बंद करण्यात आली.परिवहनची सेवा रात्री उशीरापर्यंत ग्रामीण भागात सुरू नाही.एसटीसेवा सुरू करावी हि मागणी आहे.मिळेल त्याला नळपाणी जोडणीसाठी, पण सूर्याचे पाण िलोकापर्यंत पोहचले नाही. लोकसंख्या वाढीसोबत पाणप्रिश्नाची समस्याही वाढत चालली आहे.रेल्वेचा जिवघेणा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहित.उलट बुलेट ट्रेन प्रकल्पात स्थानिक भूमिपूत्रांच्या जमीनी जाणार आहेत.पालिका क्षेत्रात अनिधकृत बांधकामे,वनजमीनीवरील अतिक्र मण यामूळे पूरपरिस्थीती उद्भवली

टॅग्स :Vasai Virarवसई विरारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक