राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात याचिका; घराबाहेर भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 10:23 PM2020-07-24T22:23:50+5:302020-07-24T22:25:27+5:30

काशिमीरा येथील विरल अपार्टमेंट मध्ये याचिकाकर्ते  साकेत गोखले राहतात . वास्तविक ते दिल्लीला असतात आणि त्यांची आई येथे राहते . लॉकडाऊन काळात ते येथील आपल्या घरी आले होते.

Petition against land pooja of Ram temple; BJP workers protest in front of home | राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात याचिका; घराबाहेर भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात याचिका; घराबाहेर भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

Next

मीरारोड - कोरोनाचा संसर्ग पाहता अलाहाबाद उच्च न्यायालयात  अयोध्येतील राम मंदिरचे भूमिपूजन आदी संदर्भात गर्दी टाळण्या बाबत याचिका केली म्हणून याचिकाकर्त्याच्या घरा बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली . या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी भाजपाच्या 10 ते 15  कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे . 

काशिमीरा येथील विरल अपार्टमेंट मध्ये याचिकाकर्ते  साकेत गोखले राहतात . वास्तविक ते दिल्लीला असतात आणि त्यांची आई येथे राहते . लॉकडाऊन काळात ते येथील आपल्या घरी आले होते. आज शुक्रवारी मीरा भाईंदर भाजपातील काही कार्यकर्ते गोखले रहात असलेल्या इमारतीच्या आवारात शिरले . त्याठिकाणी त्यांनी गोखले यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व संताप व्यक्त केला . तसेच गोखले यांनी खाली यावे अशी मागणी केली . 

काशिमीरा पोलीस घटनास्थळी पोहचण्या आधीच भाजपाचे कार्यकर्ते निघून गेले . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी गोखले यांची भेट घेऊन माहिती घेतली . गोखले यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गर्दी होऊ नये म्हणून याचिका केली होती . 

तसेच गोखले यांनी काल गुरुवारी ट्विटर वर राज्यातील विधानसभा निवडणूक वेळी राज्य निवडणूक आयोगाने भाजपाच्या आयटी सेलचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणी आयोगाने माहिती मागवली आहे . त्यातूनच भाजपाने गोखले यांच्या विरोधात निदर्शने केल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली . 

दरम्यान काशिमीरा पोलिसांनी भाजपाच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे . तसेच गोखले यांना व्यक्तिगत आणि ते रहात असलेल्या इमारत परिसरात पोलिस बंदोबस्त दिला असल्याचे संजय हजारे यांनी सांगितले . 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

दुचाकीस्वारांनो! केंद्राने नियम बदलले; अपघात टाळण्यासाठी नवा आदेश

लॉकडाऊनने एसटीचे आर्थिक गणित बिघडवले; स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

Web Title: Petition against land pooja of Ram temple; BJP workers protest in front of home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.