शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पालीत बविआ, सत्पाळ्यात ग्रामसमृद्धी पॅनेलने जिंकल्या ११ पैकी ९ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 10:06 IST

कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते.

पारोळ : वसई तालुक्यात सत्पाळा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसमृद्धी पॅनेलने ११ जागांपैकी ९ जागा जिंकत बाजी मारली असून, यामध्ये बहुजन विकास आघाडीला दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर पालीत मात्र बहुजन विकास आघाडीची सरशी झाली असून ४ पैकी ३ जागा मिळवल्या आहेत, तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. पालीमध्ये बिनविरोध झालेल्या ३ जागा बविआच्या असल्याने व निवडणुकीत ३ जागांवर विजय संपादन केल्याने ७ जागांपैकी ६ जागा आपल्याकडे घेत बविआने आपली सत्ता आणली आहे.कोरोना महामारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात वसई तालुक्यातील सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. वर्षातील पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. सत्पाळ्यात ११ जागांसाठी तर पाली ७ जागांसाठी या निवडणुकीचा कार्यक्रम लावण्यात आला. पण पालीमध्ये ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने या ठिकाणी ४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. १५ जानेवारीला कोरोनाचे नियम अटी पाळत मतदान घेण्यात आले. सत्पाळामध्ये ७९ टक्के तर पालीत ८३ टक्के मतदान झाले होते. तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निकालात सोमवारी दुपारी विजयाचे चित्र स्पष्ट झाले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक