वसई : वरोर गावात बंद पडलेला कोळंबी प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यामुळे विहीरी आणि बोअरवेलचे पाणी खारे होण्याची शक्यता असून शेतीच्या आणि बागायतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होणार असल्याने गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. डहाणू तालुक्यातील वरोर गावात चार वर्षांपासून बंद असलेला कोळंबी प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी मोठी खोदाई केली जात आहे. त्यासाठी खाडीचे खारे पाणी आणण्यासाठी मोठा नाला तयार करण्यात आला आहे. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी याठिकाणी येऊन साचून राहते. या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहीरी आणि बोअरवेलचे गोडे पाणी खारे होऊन गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई•भेडसावणार आहे. तसेच ते पिण्यास अयोग्य होणार आहे. तसेच खाऱ्यापाण्यामुळे शेतजमिनी आणि बागायतींच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे. ते काय कारवाई करतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
वरोरच्या कोळंबी प्रकल्पाला विरोध
By admin | Updated: April 20, 2016 01:46 IST
वरोर गावात बंद पडलेला कोळंबी प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यामुळे विहीरी आणि बोअरवेलचे पाणी खारे होण्याची शक्यता असून
वरोरच्या कोळंबी प्रकल्पाला विरोध
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}