शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठांपैकी एक जीवदानी माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 23:36 IST

विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठांपैकी एक अशी तिची ओळख आहे.

पारोळ/वसई : विरार येथील जीवदानी डोंगरावर वसलेली जीवदानी माता ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील अनेक शक्तीपीठांपैकी एक अशी तिची ओळख आहे. उंच डोंगरावर कडेकपारीत वसलेल्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते. विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर जीवदानी माता वसली आहे. सतराव्या शतकापर्यंत येथे जीवधन नावाचा किल्ला होता. कालौघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. याच किल्ल्यावरील हे मंदिर. १९५६ मध्ये या मंदिरात भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.तब्बल ९०० फूट उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी १४०० पायऱ्या आहेत. मंदिराचा गाभारा पाच ते सहा फूट उंच पाषाणात खोदलेला आहे. आतमध्ये दगडात कोरलेली देवीची सुबक मूर्ती असून तिच्या डोईवर सुवर्ण मुकुट आहे तर बाजूला त्रिशूळ आहे. मंदिराला लागूनच श्रीकृष्ण गुहा असून त्यालगत डोंगरात खोदलेले मोठे सभागृह आहे. मंदिराच्या बाजूला कालिका माता, भैरवनाथ, वाघोबा आदी देवतांची मंदिरे आहेत. या देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील भाविक येतात. या परिसरात वसलेला आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी इत्यादी समाज या देवीला आराध्य दैवत मानतात.नवरात्रात मंदिराला विद्युत रोषणाई आणि दरिदवशी फुलांची आकर्षक सजावट केली जाते. देवी मूर्तीच्या बाजूला पाषाण आहे. या पाषणावर सुपारी चिकटवून देवीचा कौल घेण्यासाठीही भाविक आवर्जून येतात.

टॅग्स :Navratriनवरात्रीVirarविरार