शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीची पाणीयोजना बंद

By admin | Updated: October 14, 2016 06:15 IST

डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ९ लाख रु पये खर्च करु न सुरु केलेली पेयजल योजना वीज जोडणी

शौकत शेख / डहाणूडहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ९ लाख रु पये खर्च करु न सुरु केलेली पेयजल योजना वीज जोडणी खंडित केल्याने बंद आहे. त्यामुळे डोंगरीपाडा आणि पडवळपाडा येथील ग्रामस्थ शुद्ध पाण्याला मुकले असून ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना विहिरीतून उपसून दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याची बाब आमदार अमित घोडा, माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश धोडी, डहाणू पंचायत समिती सभापती चंद्रिका आंबात, गट विकास अधिकारी रमेश अवचार यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर उघडकीस आली आहे. त्वरीत उपाययोजना करण्याचे आदेश गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता तांडेल यांना लेखी दिले असले तरी तालुक्यातील एकंदरीत परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे. ग्रामविकास अधिकारी व्ही.बी. भोईर हे विवळवेढे ग्रामपंचायतीमध्ये मागील सात वर्षांपासून ग्रामसेवक आहेत. मात्र त्यांच्या अकार्यक्षम कार्यपध्दतीचा ग्रामस्थांनी पंचनामा केला आहे. तर डहाणू तालुक्यातील वेती ग्रामपंचायत आणि विवळवेढे ग्रामपंचायतीमधील आदिवासी पाड्यांवरील योजनांचे मूल्यांकन करुन उर्वरित रक्कम संबंधितांकडून वसूल करून गंभीर कारवाई करण्याचा इशारा माजी जि.प.सदस्य जगदीश धोडी यांनी दिला.विवळवेढे ग्रामपंचायतीमध्ये चार वर्षापूर्वी १ कोटी ९ लाख रुपयाचा निधी खर्च करुन विवळवेढे पेयजल योजना सुरु केली. मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विजेचे बील न भरल्याने महावितरणने योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याने ती मागील वर्षापासून धूळखात पडली आहे. त्यामुळे विवळवेढे (महालक्ष्मी) डोंगरीपाडा, पडवळपाडा या पाड्यातील आदिवासींवर खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ ओढवली आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवक व्ही.बी. भोईर त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने काही ग्रामस्थांनी आदिवासी कार्यकर्ते अशोक भोईर यांच्याकडे तक्रार मांडली. त्यानंतर माजी जि.प.सदस्य जगदीश धोडी यांच्यामार्गदर्शनाखाली डहाणू पंचायत समितीकडे सप्टेंबरात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ही बाबी निदर्शनास आणून देवून त्वरीत उपाय करण्याची सूचना केली होती.