शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

वसईत भाजी मार्केटमध्ये बसू देत नसल्याचा राग; विक्रेत्यांनी भाज्या रस्त्यावर फेकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 8:39 PM

वसई स्टेशनच्या अंबाडी रोड मार्केट परिसरातील धक्कादायक प्रकार

वसई : वसई विरार महापालिका प्रशासनाने मार्केट परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये व गर्दी टाळण्यासाठी उपाय म्हणून खुल्या मैदानात बसावे, अथवा विविध वार्डात जाऊन भाजी विक्री करावी, असे दोन खुले पर्याय दिले आहेत. मात्र, नेहमीच्याच ठिकाणी भाजी मार्केट सुरू करण्यात आल्याने पालिकेने कारवाई केल्याच्या रागातून काही मुजोर भाजी विक्रेत्यांनी भाज्यांच रस्त्यावर फेकून विरोध दर्शविला आहे.

वाढती गर्दी व संसर्ग होऊ नये यासाठी वसई स्टेशनच्या अंबाडी रोडवरील भाजी मार्केट पालिकेच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी मागील आठ दिवसांपासून बंद केले आहे. मात्र, तरी देखील काही विक्रेते लपून छपुन भाजी विक्री करीत आहेत. सरकारच्या आवाहनानुसार शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या भाजी विक्रेत्यांना पालिकेने दोन पर्याय दिले होते. यामध्ये भाजी विक्रेत्यांनी प्रभाग  व वार्डात आणि गल्लोगल्ली जाऊन भाजी विकण्याचा पर्याय सुरुवातीला देण्यात आला होतामात्र पालिकेच्या या निर्णयाला भाजी विक्रेत्यांनी सपशेल नकार दिला. तर यावर दुसरा पर्याय म्हणून या भाजी विक्रेत्यांना माणिकपूर च्या खाजगी मैदानात जागा उपलब्ध करून दिली होती. पालिकेने तिथे सोशल डिस्टनसिंग म्हणून  मार्किंग देखील करून दिले होते. मात्र, तिथे ही हे भाजी विक्रेते जाण्यास तयार नाहीत.

दरम्यान, रविवारी पुन्हा ईथे भाजी मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न काही अडेल व मुजोर विक्रेत्यांनी केला असता यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण विभाग अधिकाऱ्याशी हुज्जत घालून त्यांची अडवणूक करण्यात आली.परिणामी महापालिकेने माल जप्त करण्यास सुरुवात केल्यावर संतापलेल्या भाजी विक्रेत्यांनी आपल्या विक्रीसाठी आणलेल्या भाज्या चक्क मुख्य रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार या ठिकाणी दुपारी पहावयास मिळाला असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

...तरीही भाजी विक्रेत्यांना नफा दिसतो आहे ?एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव व संकट देशात व राज्यात वाढत असताना आणि खास करून वसईत ही पाच रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ना आवाहन करते आहे अशी परिस्थिती असताना वर्षानुवर्षे वसईत येऊन धंदे करणारे  हे मुजोर भाजी विक्रेते केवळ नफा म्हणून पैसे कमवण आणि पार मनमानी करत असल्याचं या घटनेनंतर समोर आलं आहे.

"आम्ही या भाजी विक्रेते यांना दोन्ही पर्याय दिले त्यासाठी चार चार वेळा बैठका घेतल्या मात्र दोन्हीही पर्याय या भाजी विक्रेत्या ना मान्य नाहीत, याउलट कारवाई वेळी यातील काहींनी भाज्या चक्क रस्त्यावर फेकून विरोध दर्शविला तर याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहेत, चौकशी सुरू असून गरज पडल्यास पोलिसांकडे गुन्हे ही नोंद करू"- गिलसन घोनसालवीससहायक आयुक्त, प्रभाग "एच "समिती

टॅग्स :Vasai Virarवसई विरार