शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील पाण्याचे स्रोत वाचवणे गरजेचे!

By admin | Updated: May 13, 2017 00:30 IST

वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने

सुनील घरत। लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई तालुक्याला लाभलेल्या सागरी , नागरी,व डोंगरी भागापैकी सागरी व डोंगरी भागातील लोकसंख्या प्रचंड गतीने वाढत असल्याने नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे . नागरी भागातील नागरिकांना प्राप्त होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. वसईच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आपापल्या भागात रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करणे, उपलब्ध बावखळे व विहिरी वाचवणे ,पाण्याचे जमिनीतील संधारण वाढविणे , त्यासाठी ठिकठिकाणी व डोंगर उतारावर चर खणणे, उपलब्ध स्त्रोतातील गाळ साफ करणे अशा उपाय योजना करणे महत्वाच्या आहे . वसई उप प्रदेश हा मुंबई महानगरीलगत असल्याने येथे नागरीकिरणाचा वेग मोठा आहे. त्याच्या मानाने पायाभूत सुविधांबरोबर पाण्याची सोय ही अत्यंत महत्वाची आहे. शहरी भागासाठी महापालिकेची जलपुरवठा यंत्रणा आहे परंतु ग्रामीण भाग मात्र उपेक्षितच राहिला आहे.याबाबतीत येथील ग्रामपंचायतींना व नियोजनबद्ध काम करावे लागेल . याच बरोबर येथील नागरिकांचेही पाण्याचा योग्य वापर कसा करावा, पाणी कमीत कमी कसे वापरावे, पाण्याची बचत कशी करावी याबाबत प्रबोधन करावे लागेल.याची सर्व जबाबदारी शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माथी मारण्याऐवजी जागरूक नागरिकांनीही आपल्या परिसरात आवश्यकती दक्षता घेऊन जनप्रबोधन केले पाहिजे. अन्यथा दरसाल प्रमाणे एप्रिल, मे व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष सहन करावे लागेल. गेल्या वर्षी वरूण राजा आपल्यावर प्रसन्न होऊन योग्य बरसला आहे . त्यामुळे वसई उप प्रदेशातील सागरी व डोंगरी भागात पावसाळा संपल्यानंतर अजूनही काही ठिकाणचे ओहोळ वाहणे सुरु आहेत. काही ठिकाणी सामाजिक संस्था,वनविभाग व जागरूक नागरिकांनी वनराई बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी साठवले आहे. मात्र ते प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे. ते वाढवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. सांडपाण्याचा वापर वेगवेगळ्या संकुलातील उद्यांनांसाठी अथवा स्वच्छतेसाठी करणे, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर न करणे, बांधकामांसाठी पाण्याची कनेक्शन्स न देणे, असतील ती बंद करणे असे इलाज केले तर पाणीटंचाई तीव्रता निश्चितच कमी करता येईल. उपहारगृहे व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी टाळली तरी त्यातून मोठी पाणीबचत होऊ शकते त्या दृष्टीनेही जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.