शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खाडीपूल, वसई समुद्रातील गॅस; दोन्ही प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे

By admin | Updated: June 29, 2015 04:31 IST

नायगांव खाडीवरील जुन्या रेल्वे पूलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी व वसईच्या समुद्रातील गॅस स्थानिकांना उपलब्ध करणे असे दोन महत्वाचे प्रश्न आता लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहेत.

दीपक मोहिते, वसईवसई-विरार उपप्रदेशात भार्इंदर नायगाव दरम्यान असलेल्या नायगांव दरम्यान असलेल्या नायगांव खाडीवरील जुन्या रेल्वे पूलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीची परवानगी व वसईच्या समुद्रातील गॅस स्थानिकांना उपलब्ध करणे असे दोन महत्वाचे प्रश्न आता लवकरात लवकर सुटणे गरजेचे आहेत. या दोन्ही प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पूलासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक निधी उपलब्ध केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली तर पालघरचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी सतत पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून वसई समुद्रातील गॅस स्थानिकांना देण्यास मंजूरी मिळवली. या दोन्ही प्रकल्पामुळे उपप्रदेशाच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणत उपलब्ध होऊ शकतील. नायगाव खाडीवरील पुलामुळे इंधन, वेळ व पैशाची बचत होणार आहे. सध्या वसई विरारकरांना मुंबई शहर गाठण्यासाठी रेल्वे व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग असे दोनच पर्याय आहेत. रेल्वे ठप्प झाली की राष्ट्रीय महामार्गशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. अशावेळी महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता अन्य पर्याय निर्माण होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन गेली ८ वर्षे या प्रश्नाचा सतत पाठपुरावा करण्यात येत होता, परंतु त्याकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध होत नव्हता. अखेर मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाने आपले क्षेत्र विकसित केले व आशेचा किरण दिसू लागला. अखेर निधीचा मुुद्दा मार्गी लागला. त्यामुळे आता प्रत्यक्षात कामाला सुरूवात होऊन हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी वसई-विरारकरांची अपेक्षा आहे.दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे वसईच्या समुद्रातील गॅस हा अन्य प्रदेशाकडे पाठवण्यात येतो. हा गॅस पाईपलाईद्वारे उपप्रदेशातील नागरिकांना मिळावा तसेच या गॅसवर औद्योगिक प्रकल्प उभारून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी ७ वर्षापूर्वी आ. हितेंद्र ठाकूर यांनी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारकडे केली होती. त्यानंतर पक्षाचे खासदार निवडून आल्यानंतर त्यांनी या मागणीचा जोरदार पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन खा. बळीराम जाधव यांन केंद्रीय पेट्रोलियम खात्याच्या सचिवांसमवेत वेळोवेळी चर्चा केली अखेर गेल्या महिन्यात केंद्रीय पेट्रोलियम सचिव कृष्णन यांनी पत्र पाठवून मागणी मान्य करीत असल्याचे कळवले. त्यामुळे आता हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे ते प्रकल्प पूर्ण झाल्यास उपप्रदेशाच्या विकासाला वेग येईल व बेरोजगारांना रोजगाराच्या संधी नक्कीच उपलब्ध होऊ शकतील.