शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेलर्स लुटण्यासाठी आलेली टोळी विरारमध्ये जेरबंद

By admin | Updated: April 14, 2016 00:42 IST

गुजरातमध्ये दरोडा टाकून विरारमधील ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारीच्या टोळीला अर्नाळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुजरातमधील लुटीच्या मालासह हत्यारे

विरार : गुजरातमध्ये दरोडा टाकून विरारमधील ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारीच्या टोळीला अर्नाळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुजरातमधील लुटीच्या मालासह हत्यारे जप्त करण्यात आली. झारखंड, बिहार, गुजरात राज्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या व दरोडे घालणाऱ्या एका सराईत टोळीचे खतरनाक गुंड विरारमधील सागर ज्वेलर्स लुटण्यासाठी येत असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी आपल्या पथकासह पहाटेच्यावेळी सापळा रचला होता. पहाटे दीडच्या सुमारास दहा जण सागर ज्वेलर्सजवळ आले असताना दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर झडप मारली. यावेळी मोहम्मद जमिल अली, मनीष टेकबहादूर शाहुद, जिरी हरंगी यादव , पप्पू रोहिल पासवान , बसंत कृष्णदेव पासवान , संजिद बिसुप्रसाद शर्मा, अन्सारुल हुसेन , कोकीला मदन विश्वकर्मा यांना अटक करण्यात आली. तर अंधाराचा फायदा घेऊन मदन विश्वकर्मा आणि कबीर शेख पळून गेले. या दरोडेखोरांकडून दहा हजार रुपये रोख, पाच तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन त्याचबरोबर दरोडा टाकण्यासाठी आणलेला गॅसकटर, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, पकड, हॅकसॉ ब्लेड, रस्सी, सिलेंडर, लोखंडी प्रहार, सुरा. छिन्नी, हातोडी जप्त करण्यात आले. आरोपी जमील अली याच्याविरोधात दोन ज्वेलर्सच्या दुकानांवरील दरोडे आणि एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.