शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपाडा-वाकीपाड्यात येण्यास मनाई आदेश

By admin | Updated: April 16, 2016 00:33 IST

वसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी

- शशी करपे,  वसईवसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाच्या तीन दिवस आधीपासून बाहेरील लोकांना गावात येण्यास मनाई आदेश जारी केला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १७ एप्रिलला चंद्रपाडा आणि वाकीपाडा ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. दोन्ही गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मागील निवडणुकीतील राजकीय संघर्ष लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ते १८ एप्रिल अशा तीन दिवसांसाठी स्थानिक लोकांव्यतिरिक्त बाहेरील गावांतील लोकांना गावांत मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुचंद्र व पंचक्राशीतील गावे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील राहिली आहेत. २००४ मध्ये जुचंद्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन राजकीय गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. तर, २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारावरून शिवसेना व बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय हाणामारी झाली होती. या हाणीमारी प्रकरणात वालीव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. बाहेरील मतदानसंघातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत येऊन स्थानिक रहिवासी व भाडेकरू यांना धमकावून जबरदस्तीने आपल्या पक्षास मतदान करण्याचा धाक दाखवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे मत आहे.येथील गावकऱ्यांची मते आणि राजकीय संघर्षाची शक्यता पालघर पोलीस अधीक्षकांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून देऊन तीन दिवसांसाठी गावातील ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील लोकांना गावात मतदानाच्या कामासाठी येण्यास बंदी होण्यासाठी सीआरपीसी १४४ (१)(२)(३) प्रमाणे मनाई आदेश निर्गमित करावेत, असे कळवले होते. त्यानुसार, पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना प्राप्त असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७६ चे कलम १४४ (२) व (३) अन्वये अधिकाराचा वापर करून १६ ते १८ एप्रिल या तीन दिवसांसाठी चंद्रपाडा व वाकीपाडा गावांत स्थानिक ग्रामस्थांव्यतिरिक्त बाहेरील गावातील लोकांना मतदानाच्या कामासाठी येण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.