शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Lok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 15:05 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पालघर/ भंडारा - पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी १८ लाख मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्रीनिवास वनगा (शिवसेना), राजेंद्र गावित (भाजपा), दामू शिंगडा (काँग्रेस), बळीराम जाधव (बविआ), किरण गहला (मार्क्सवादी) यांच्यामध्ये मुख्य पंचरंगी लढत आहे. २०९७ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे.  या पोटनिवडणुकीकरिता १२ हजार ८९४ कर्मचारी, तसेच ४ हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. २०९७ केंद्रांपैकी १४ केंद्रे संवेदनशील असून, या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार आहे.

भंडारा-गोंदियात आघाडी आणि भाजपात मुख्य लढतभंडारा-गोंदिया येथे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे हेमंत पटले व आघाडीचे मधुकर कुकडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

LIVE UPDATES 

-पालघर पोटनिवडणूक : ईव्हीएमऐवजी बॅलट पेपर वापरा, खा. अनिल देसाई यांची मागणी - पालघर पोटनिवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत 19.25% मतदान!- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : EVMच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय : खासदार प्रफुल्ल पटेल- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्याची मागणी समोर येत आहे : खासदार प्रफुल्ल पटेल- भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : ईव्हीएममधील बिघाडांच्या तक्रारीबाबत गांभीर्याने विचार व्हावा : खासदार प्रफुल्ल पटेल - भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : अनेक मतदान केंद्रांवर फेरमतदान घ्यावं लागेल :  खासदार प्रफुल्ल पटेल

- भंडारा-गोंदियात कुठेही मतदान रद्द केलेलं नाही, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची माहिती

 

(Palghar bypoll 2018 : पालघरचे गोरखपूर होईल, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका)

- पालघर पोटनिवडणूक - वसई निर्मळ येथील माळी आळी, मावंडा, नवाले, नंदनवन या चार गावांचा मतदानावर बहिष्कार, स्थानिक समस्यांनी त्रस्त नागरिक सर्वच राजकीय पक्षांवर नाराज, दीड हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार 

- पालघर : तारापूर, शेलवाली, कमारे, सातपाटी, मायखोप, धुकटण, चिंचणसह अनेक मतदान केंद्रावरील EVM बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा

- पालघर लोकसभा पोटनिवडणूक- सकाळी 11 वाजेपर्यंत 10.27 टक्के मतदान.

(२५ टक्के ईव्हीएम मशीन्स एकाएकी कशा काय बिघडतात? प्रफुल्ल पटेल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार)

- पालघर : जव्हार दादरकोपरा बुथवरील ईव्हीएम वोटिंग मशीन गेल्या तासभरापासून बंद. तासभर मतदारांचा खोळंबा.

- पालघर पोटनिवडणूक : सकाळी 9 पर्यंत 7 टक्के मतदान.

- पालघर लोकसभा पोटनिवडणूक : विरार पश्चिमेकडील विद्याविहार शाळेतील EVM गेल्या दीड तासापासून बंद, मतदार त्रस्त.

- पालघर लोकसभा पोटनिवडणूक : ईव्हीएममध्ये हेराफेरी करत असल्याचा उमेदवार बलिराम जाधव यांचा आरोप. वसई पूर्व आडणेतील निवडणूक अधिकारी अडचणीत. बलिराम जाधवांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार.

 

 

- पालघर लोकसभा पोटनिवडणूक : ईव्हीएममध्ये हेराफेरी करत असल्याचा उमेदवार बलिराम जाधव यांचा आरोप. वसई पूर्व आडणेतील निवडणूक अधिकारी अडचणीत.  बलिराम जाधवांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार.

- भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत पाच टक्के मतदानाची नोंद

- पालघर : भाजपाकडून मतदारांना प्रलोभन देत असल्याची ऑडिलो क्लिप व्हायरल. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईकांच्या ऑफिसमधून फोन.

- प्रभोलभन दाखवण्याची भाजपाला आवश्यकता नाही, राजन नाईक यांनी आरोप फेटाळले

- भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.

  • 08:07 AM :पालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर

- पालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.

- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नव्याने EVM आणि  VVPAT मशीनचा वापर करण्यात येत असताना तालुक्यातील  मतदान केंद्रावर मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे मतदान सुरू झाले नसल्याने मतदानाचा वेळ फुकट जात असून वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

- पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.

 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा