शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारला खड्डेमय रस्त्यांतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 03:49 IST

मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही.

विरार : वसई-विरारमधील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.मागील काही वर्षांत वसई-विरार शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या तुलनेत महापालिका मात्र सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही. विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहने चालवताना व चालताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही वर्षांत मनवेलपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे, मात्र आजही येथील नागरिक खड्ड्यांतून मार्गक्रमण करत आहेत.या पावसाळ्यातही विरार स्थानक ते मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना नारिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत विरार शिवसेनेच्या वतीने वसई-विरार महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत, मात्र याबाबत पालिकेने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत वसई-विरार महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे न भरल्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे व तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपशहरप्रमुख उदय जाधव व शिवसेना उपविभागप्रमुख प्रवीण आयरे यांनी दिला आहे.जूचंद्र येथील तरुणांची कौतुकास्पद कामगिरीविरार : पावसाळ्यात जागोजागी पडलेल्या खड्डेमय रस्त्यांतून वसई-विरारकरांना प्रवास करावा लागत असताना महापालिका प्रशासन खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जी करत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे, मात्र नायगाव पूर्व-जूचंद्र येथील तरुणांनी एकत्र येऊन रस्त्यांत पडलेले खड्डे बूजवून ज्यूचंद्रकरांना दिलासा दिला आहे.मागील काही महिन्यांपासून नायगाव पूर्वेतील मुख्य रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले होते.या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रात्रीच्या सुमारास या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत होते; परंतु पालिका या रस्त्याची डागडुजी करत नसल्याने जूचंद्र गावातील तरुणांनीच एकत्र येत फावडे व घमेले घेऊन जूचंद्र रेल्वे फाटक ते कर्मवीर महाविद्यालय या परिसरातील खड्डे बुजविले. नेहमीच नागरिकांच्या सातत्यपूर्ण नवनवीन सामाजिक कार्यासाठी ज्यूचंद्र हे गाव ओळखले जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार