शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मीची यात्रा आजपासून

By admin | Updated: April 22, 2016 01:47 IST

डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे. सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांना पुरवावयाच्या सोयीसुविधा व सुरक्षतेची जय्यत तयारी झाली असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोष देशमुख व सेक्रेटरी वसंत सातवी यांनी दिली.वर्षभरात या देवीचे बारसी, नवरात्र, यात्रा आदी निरनिराळे उत्सव होतात. चैत्र महिन्यात पौर्णिमेपासून पंधरा दिवसाची यात्रा भरते यात्रेत मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याातून व गुजरात राज्यातून लाखो भाविक येतात. यात्रेदरम्यान चैत्रपौर्णिमेला पहिला होम व त्यानंतर अष्टमीला दुसरा होम असतो. देवीवर आदिवासी समाजाची मोठी श्रद्धा असून आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती आदी समाजाचे भाविक देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. मंदिरात पुजारी हे सातवी कुटूंबातील आदिवासी समाजाचे आहेत.आख्यायिका अशी की, कोल्हापूरच्या या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली असता वाटेत विवळवेढे डोंगरदऱ्यातून जात असतांना विश्रांतीची गरज भासू लागली व विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगराच्या शिखरावर गेली व येथील कान्हा ठाकूर नावाच्या भक्तास देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व पूजा करण्यास सांगितले व कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने रोज देवीची डोंगरावर जाऊन पूजा करू लागले आणि पुढे महालक्ष्मी देवी येथेच स्थायिक झाली असे महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात वर्णन करण्यात आले आहे.प्रसिद्ध महालक्ष्मी मातेचे मूळ मंदिर तिथल्याच एका डोंगरावर आहे. परंतु तेथे जाणारी वाट अत्यंत अडचणीची व धोकादायक असल्याने देवीचे पुजारी व भाविक यांच्या सहकार्याने देवीचे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी बांधण्यात आले. परंतु नंतर मात्र दानशूर भाविक नारायण जावरे यांच्या प्रयत्नाने देवीचे मंदिर मुळ वास्तव असलेल्या डोंगरावरही सुंदर बांधले आहे. त्यास महालक्ष्मी गड असे ओळखले जाते.पुजारी चैत्रशुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री १२ वा. ध्वज, पूजेचे साहित्य, नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो व तीन मैलाचा रस्ता कापून ३ वा. डोंगरावर चढतो तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो आणि सकाळी परत येतो. ६०० फुटावर ध्वज लावतांना त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात. (वार्ताहर)