शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पालघर कलेक्टर कचेरीवर पत्रकारांचा मोर्चा

By admin | Updated: October 4, 2016 02:10 IST

राज्यातील पत्रकारावर होत असलेले हल्ले, दाखल होत असलेले खोटे गुन्हे, मुस्कटदाबी, जेष्ठ पत्रकारांचे पेन्शन ई. बाबत निर्णय घेण्यास शासन वीस वर्षांपासून

पालघर : राज्यातील पत्रकारावर होत असलेले हल्ले, दाखल होत असलेले खोटे गुन्हे, मुस्कटदाबी, जेष्ठ पत्रकारांचे पेन्शन ई. बाबत निर्णय घेण्यास शासन वीस वर्षांपासून टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने सोमवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील पत्रकारांच्या सोळा संघटनांनी स्थापन केलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने हुतात्मा स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, उपाध्यक्ष सुरेश काटे,शाम आटे, नारायण पाटील, हुसेन खान, मच्छीन्द्र आगीवले, अमोल सांबरे, पालघर तालुका मराठी पत्रकार संघ हेमेंद्र पाटील, विजय घरत, विनायक पवार, के.नारायण,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजीव जोशी, नीरज राऊत,वैभव पालवे, प्रमोद पाटील, यांनी जिल्हाधिकारी बांगर आणि पोलीस अधिक्षिका राऊत यांना निवेदन सादर केले.आम्ही सत्तेत आल्यावर लगेच पत्रकार संरक्षण कायदा करू आणि जेष्ठ पत्रकारांना पेन्शन देऊ असे आश्वासन भाजपने नागपूर येथे पत्रकार हल्ला विरोधी समितीने काढलेल्या मोर्च्या दरम्यान दिले होते. सत्ता बदला नंतर भाजपा सरकार दोन वर्षापासून सत्तेत आल्यानंतर प्रतीक्षा करूनही पत्रकारांना न्याय मिळालेला नाही. सरकार कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना चिंता वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच आता पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा नवीन ट्रेंड महाराष्ट्रात सुरु झाला आहे. माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी मारक आणि समाजस्वास्थ्य बिघडविणारा आहे. म्हणून सरकारने कायद्याचा जो मसुदा तयार केला आहे त्यानुसार वटहुकूम काढावा आणि राज्यात तातडीने पत्रकारांना कायदेशीर संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.(वार्ताहर)