शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये पोटनिवडणूकीची तयारी आहे जय्यत सुरू

By admin | Updated: May 20, 2017 04:57 IST

जव्हार नगर परिषदेच्या ५ प्रभागांतील पोटनिवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरूवार व शुक्रवारी आदिवासी भवन येथे कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग सुरू झालेले आहे.

- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार नगर परिषदेच्या ५ प्रभागांतील पोटनिवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गुरूवार व शुक्रवारी आदिवासी भवन येथे कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग सुरू झालेले आहे. तसेच मतदान केंद्रांची साफसफाई व लागणारी स्टेशनरी कापड इत्यादी वस्तूंचे बूथ प्रमाणे वाटप सुरू झालेले आहे. या प्रभागांसाठी २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडून येणाऱ्या पाच नगरसेवकांना अवघा सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. तरीही निवडणूक लढविली जात आहे. तसेच या निवडणूकी करीता १२ मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली असून प्रभाग क्र. १ मध्ये म्यु. पल समाजमंदीर गोरवाडी, बालसंस्कार केंद्र यशवंतनगर, पंचायत समिती तळमजला गटसाधन केंद्र, पंचायत समिती दुसरी ईमारत, तर प्रभाग क्र. ३ मध्ये म्यु. पल बालसंस्कार केंद्र महादेव आळी, राधा विद्यालय जुने खोली क्र. ३, ५ व ७ व प्रभाग क्र. ४ मध्ये नवीन पोलीस लाईन समाज मंदीर, जिमखाना हॉल, अंबिका चौक समाज मंदीर व मांगेलवाडा समाज मंदीर अशा १२ केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. या निवडणूकीकरीता पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत, तसेच मतदारांनी आपला हक्क बजावा व जास्ती जास्त मतदानाला उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी पवनित कौर व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विधाते यांनी केले आहे. या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला होता. परंतु जव्हार प्रतिष्ठानने आपले उमेदवार उभे केल्याने पक्षांनी आपले उमेदवार अपक्ष उभे केले आहेत.