शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जय भवानी, जय चिमाजी, जय वज्राईचा जय घोष...सुनिल घरत ।

By admin | Updated: May 14, 2017 22:40 IST

नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या शूरवीरांनी, जुलमी, अराजक व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अश्या फिरंगी पोर्तुगीज सत्तेचे उत्तर कोंकणातून समूळ उच्चाटन केले

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या शूरवीरांनी, जुलमी, अराजक व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अश्या फिरंगी पोर्तुगीज सत्तेचे उत्तर कोंकणातून समूळ उच्चाटन केले. तो दिवस म्हणजे वसई चा विजयोत्सव. मराठेशाहीच्या विजयाचे हे २७९ वे वर्ष सल्याने ते शहरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या उत्सवा निमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन केले होते.पोर्तुगीजांच्या अराजकतेमुळे, धर्मांधतेमुळे, भेदाभेदामुळे, जुलमामुळे हैराण झालेल्या वसईकर रयतेला मुक्त व सुखी करण्यासाठी बाविस हजार मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका युरोपीय सत्तेविरूद्ध मिळवलेला भारतातील हा पहिलाच विजय होता. वसई जिंकण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी योगिनी वज्रेश्वरी देवीकडे नवस केला होता. पुढे वसईवर भगवा जरीपटका फडकला व वसईतील रयत पुन्हा सुखी झाली. या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून गेल्या सात वर्र्षांपासून वसई-विरार महानगरपालिके तर्फे वज्रेश्वरी ते वसई किल्ला ‘भव्य मशालयात्रेचे’ आयोजन करण्यात येते. या वर्षी मशालयात्रेत १५० दुचाकी व १०० हून अधिक सायकल स्वारांनी भाग घेतला होता. वज्रेश्वरी मंदिरात आरती करून मशालयात्रेचे उद्घाटन वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांच्या हस्ते झाले. नरवीर चिमाजी आप्पांच्या व मावळ्यांच्या पोषाखातील ‘आमची वसई’ च्या सदस्यांनी मशाल मिरवत पुढे नेली. ठीक ठिकाणी मशालयात्रेचे स्वागत करण्यात आले. किल्ल्यात मशाल यात्रेच्या स्वागतासाठी पालघरचे खासदार चिंतामण वनगा, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, वसईचे माजी आमदार डॉमनिक घोंसाल्वीस, महापालिका महापौर प्रवीणा ठाकूर, बसीन कॅथोलीक बँकेचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो आदी मान्यवर उपस्थित होतेयावेळी ‘जाणता राजा शिवछत्रपती’ हे महानाट्य बघण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. खाद्यमहोत्सव व बालजत्रेचा आनंद घेत कार्यक्र माची सांगता झाली. आमची वसई सामाजिक समुहाने वसई विजयोत्सव आयोजित करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अभिनंदन केले.