शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील रोजगार हमी याेजनेतील सिंचन विहिरी अडकल्या लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 02:03 IST

लाभार्थ्यांचे हेलपाटे

राहुल वाडेकरविक्रमगड : शेतीला सिंचनासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेनुसार सिंचन विहिरीची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेल्या या याेजनेंतर्गत ९४ गाव-पाडे असणाऱ्या विक्रमगड तालुक्यात सध्या रोहयो योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे एकही काम सुरू नाही. तालुक्यातील विविध गावांतील ३० विहिरींचे प्रस्ताव ३४ प्रकारच्या विविध कागदपत्रांची पूर्तता नसल्याने अपूर्ण असल्याचे कारण देत दाेन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे परत पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे ही याेजना लालफितीत अडकल्याची स्थिती दिसत आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे, असा आराेप लाभार्थी करत आहेत. या विहिरींना जि.प. व पं.स.कडून मंजुरी देऊन ही सिंचन विहिरींची कामे सुरू करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. या याेजनेमुळे पाणीटंचाईवर मोठी मात होऊ शकते. मात्र, जि.प. व पं.स. कागदपत्रांच्या पूर्ततेत ही याेजना अडकवून दिरंगाई करत असल्याचा आरोप लाभार्थी करत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीच्या बांधकामासाठी शासन तीन लाखांचे अनुदान देते. त्यामुळे लाभार्थीसंख्या वाढत आहे. माझ्या शेतीला सिंचन व्यवस्था नसल्याने तीन वर्षांपासून रोहयोंतर्गत विहिरींसाठी सर्व कागदपत्रे जमा करून ग्रामपंचायतीकडे सादर केली. त्यासाठी अपूर्ण कागदपत्रांचे कारण दिले जात आहे. पं.स. विक्रमगड येथे जाऊन अधिकाऱ्यांकडे दोन वर्षांत अनेक वेळा विचारणा केली. जि.प. पालघर येथे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आल्याचे ओंदे येथील शेतकरी बबन सांबरे यांनी सांगितले.

रोहयोंतर्गत विक्रमगड तालुक्यातील ३० सिंचन विहिरींचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. ३४ प्रकारची कागदपत्रांची पूर्तता नसल्याने हे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते पुन्हा आमच्या कार्यालयाकडे आले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहोत. वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतरच तालुक्यात रोहयोंतर्गत सिंचन विहिरींची कामे सुरू होऊ शकतील.- बाबासाहेब गायकवाड, प्रकल्प अधिकारी, रोहयो,पंचायत समिती, विक्रमगड

n अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतात. रब्बी हंगामात त्यांना त्यातून राेजगार उपलब्ध हाेताे. n त्यामुळे अनेक शेतकरी सिंचन याेजनेतील विहिरींसाठी अर्ज करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर