शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

आयआरबीचे बँक खाते केले सील

By admin | Updated: March 25, 2016 00:31 IST

महसूल खात्याने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून ५ कोटी ४० हजार रुपयांच्या गौण खनिज वसुलीसाठी वसईच्या तहसीलदारांनी आयआरबीचे बँक खाते सील केले आहे.

वसई : महसूल खात्याने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून ५ कोटी ४० हजार रुपयांच्या गौण खनिज वसुलीसाठी वसईच्या तहसीलदारांनी आयआरबीचे बँक खाते सील केले आहे. यंदा महसूल खात्याने ९२ टक्क्यांहून अधिक वसुली करून विक्रम केला आहे. चालू आर्थिक वर्षात महसूल खात्याला ८२ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट होते. बुधवारपर्यंत तहसील कार्यालयाने ७५ कोटी ५९ लाख ९३ हजार रुपयांची वसुली केली आहे. त्यात जमीन महसूलपोटी ३० कोटी, पालिकेकडील उपकरापोटी ८ कोटी ३१ लाख, गौण खनिज २४ कोटी ९९ लाख आणि करमणूककरापोटी १५ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे.वसई-विरार महापालिकेच्या ठेकेदारांनी बेकायदेशीरपणे मातीभराव केल्याप्रकरणी पालिकेला २६ कोटी २७ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी पालिकेकडून अवघे २ कोटी ४३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. आयआरबीने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ससुनवघर, सोपाराफाटा आणि शिरसाडफाटा या ठिकाणी तीन उड्डाणपूल बांधले आहेत. त्यासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाची रॉयल्टी भरलेली नाही. त्यामुळे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी पुलांचे मोजमाप घेऊन आयआरबीला ५ कोटी ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. अनेक नोटिसा बजावूनही आयआरबीने दंड न भरल्याने कंपनीचे तामतलाव येथील बँक आॅफ इंडियात असलेले खाते सील करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पाटोळे यांनी दिली. (प्रतिनिधी)