शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाईमुळे फटाके विक्रीवर परिणाम

By admin | Updated: October 24, 2014 00:19 IST

: किंमतीत झालेली वाढ, आर्थिक मंदी, ध्वनी प्रदुषणाबाबत झालेली जागृती. या अनेक कारणामुळे फटाके दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

पनवेल : किंमतीत झालेली वाढ, आर्थिक मंदी, ध्वनी प्रदुषणाबाबत झालेली जागृती. या अनेक कारणामुळे फटाके दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पनवेल परिसरात होलसेल विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक विक्रेत्यांचा पन्नास टक्के माल तसाच पडून असल्याने फाटके मार्केटमध्ये अवकळा पसरल्याचे दिसून आले. फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी उत्तम संधी म्हणजे दिवाळी म्हणून आनंदाचा उत्सव असलेल्या या सणाचे बच्चे कंपनी वाट पाहत असतात. दिवाळीच्या अगोदरच लहानगे फटाके विकत घेण्यासाठी कोणी आई -वडिलांकडे, कोणी काका आणि मामाकडे हट्ट करतात. त्यामुळे बाजारात चार पाच दिवस अगोदरच फटाके खरेदीसाठी मोठी गर्दी होते. पनवेल व सिडको वसाहतीत सुरक्षिततेच्या दुष्टीने एक सुरक्षित जागा निवडूण तेथे स्टॉल टाकण्यात येतात. यंदा निवडणुकीची धामधुम असल्याने उशीरा स्टॉल उभारण्यात आले होते.पनवेलचे विक्रेते शिवकाशी, तामिखेळनाडू येथून माल आणतात. यंदा १० ते १५ टक्क्यांनी फटाक्यांच्या किंमती वाढल्या आहेत. दरवर्षी फॅमिल पॅकला विशेष मागणी असते मात्र यंदा त्याकडे पाठ फिरवण्यात आली आहे.पाऊस , चक्री, फुलबाजे, बॉम्ब, रॅकेट लंवगी, अशा प्रकारांची सर्वसाधारण जागा मागणी असल्याने या फटक्यांची जादा आॅर्डर दिली जाते. परंतु ही मागणी दरवर्षापेक्षा ५०टक्क्याने कमी असल्याची माहिती होलेसेल विक्रेते सदानंद पाटील यांनी दिली. आमची दरवर्षाप्रमाणे यंदाही दोन दुकान असून माल जास्त आणला आहे. मात्र ग्राहकच नसल्याने हा माल ठेवायचा कुठे असा प्रश्न पडला असल्याचे पाटील म्हणाले. चायना बनावटीचे फटाकेही बाजारात उपलब्ध आहेत मात्र ते देशी बनवटीपेक्षा जास्त धोकादायक असल्याने गेल्या एक दोन वर्षापासून ते ग्राहक खरेदी करीत नाहीत. या वर्षी तर चायना सोडा स्वदेशी बनावटीचा मालाची विक्री झाली नसल्याचे दिनेश पाटील या विक्रेत्याने लोकमतला सांगितले.दिवाळीत पनवेलमध्ये फटाक्याच्या खरेदी विक्रीत सुमारे ७ ते ८ कोटी रूपये उलाढाल होते यंदा ती चार कोटीवर स्थिरावण्याची चिन्ह दिसू लागले असल्याचे एका मोठया व्यापाऱ्याने सांगितले. यावेळी किंमतीतही कमालीची वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला न परवडणारी बाब झाली आहे.त्यामुळे अनेकांनी मुलांची समजूत काढून अतिशय कमी फटाके खरेदी केले असल्याचे कळंबोलीतील होलसेल विक्रेते संतोष घरत म्हणाले.प्रदुषणमुक्त दिवाळी ही संकल्पना गेल्या काही दिवसापासून सोशल मिडियावर अधिक गाजत आहे. अनेक सामाजिक संस्थानी फटके विरहीत दिवाळी साजरी करण्यासाठी जनजागृती केली. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देऊन त्याचे दुष्परीणामाची जाणीवर करून देण्यात आली. त्याचाही फरक यावेळी फटका खरेदीवर पडला असून विद्यार्थी व पालकांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेही फटक्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसते. (वार्ताहर)