शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भूक मिटवा, मग फराळ करा ?

By admin | Updated: October 28, 2016 02:28 IST

जव्हार आणि मोखाड्यात सहाशेहून आदिवासी बालके मृत्युमुखी पडली असतांना लवाजम्यासह येऊन आदिवासींमध्ये दिवाळी साजरी करणे म्हणजे आदिवासींच्या जखमेवर मीठ

- शशी करपे,  वसईजव्हार आणि मोखाड्यात सहाशेहून आदिवासी बालके मृत्युमुखी पडली असतांना लवाजम्यासह येऊन आदिवासींमध्ये दिवाळी साजरी करणे म्हणजे आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित यांनी केला आहे.शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला घेऊन आदिवासीपाड्यांवर फराळ घेऊन दिवाळी साजरी करण्यासाठी येणार आहेत. त्यावर पंडितांनी टीका केल्याने दौरा वादग्रस्त झाला आहे.इथला पूर्ण आदिवासी समाज दु:खामध्ये असतांना महाजन यांना दिवाळी साजरी करण्याचे सुचते आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असा आरोप पंडित यांनी लोकमतशी बोलताना केला. तुम्ही याठिकाणच्या रोजगार निर्मितीसाठी, भूक भागविण्याच्या योजनांसाठी इथला आदिवासी आक्रोश करीत आहे. आजही बीएएमएस डॉक्टर्स आणि अस्थायी डॉक्टरांच्या सेवेचा निर्णय घेण्यात आलेला नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सहा-सहा महिने वेतन मिळत नाही. रोजगार हमी सेवकांच्याबाबतीतील तरतूद पूर्ण केलेली नाही. रोजगार पूर्ण करीत नाही. राज्य सरकार याठिकाणची भूक शमविण्यासाठी काहीही करीत नाही, असे असतांना फराळ घेऊन येणे निर्लज्जपणाचा कळस आहे, असा पंडित यांचा आरोप आहे. आदिवासींचे हे प्रश्न सोडवणार असाल तर दिवाळीत आदिवासींचा फराळ चाखायला याठिकाणी जरूर या, असेही पंडित यांचे म्हणणे आहे. याठिकाणी सरकारी वैद्यकीय महाविद्याले सुरु करणार का? आरोग्य केंद्रांमध्ेय कायमस्वरुपी डॉक्टर ठेवणार आहेत का? कंत्राटींना कोर्टाच्या निर्णयानुसार कायमस्वरुपी कामगारांइतका पगार आणि सोयी सुविधा देणार का? याची उत्तरे मंत्र्यांकडून अपेक्षित असल्याचे पंडित यांनी सांगितले. काय असेल मेनू?चवला आणि करांदं हा आदिवासींचा फराळ आहे. म्हणून भुकेने व्याकूळ असलेला इथला आदिवासी पारंपारिक फराळ घेऊन मंत्र्यांचे स्वागत करणार आहेत. व आपल्या मूलभूत प्रश्नांचा जाब मंत्र्यांना विचारणार आहेत, असेही ते म्हणाले.