शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

येत्या १५ दिवसांत कचरा समस्या निकाली काढण्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आयुक्तांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 00:03 IST

वसई-विरार महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने पालिकेला प्रत्येकी ८० लाख रुपये दंड बजावला आहे.

विरार :  वसई-विरार शहरातील कचरा समस्या गंभीर आहे. शहरात रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग दिसतात. ही समस्या गंभीरतापूर्वक घ्या; अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा. फेब्रुवारी महिन्यात ही समस्या दिसता कामा नये. ही समस्या निकाली काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत देतो, अशा शब्दात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांना धारेवर धरले.

वसई-विरार महापालिकेच्या सर्व क्षेत्रांतील विकासकामांसंदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी १० वाजता पालिका सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व तहसीलदार व सर्व पालिका अधिकारी उपस्थित होते.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने पालिकेला प्रत्येकी ८० लाख रुपये दंड बजावला आहे. शिवाय या सगळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिलेली मुदत उलटून गेल्याने डिसेंबर २०२० नंतर प्रत्येक महिना २० लाख रुपये इतका अतिरिक्त दंड ठोठावला आहे. ही बाब आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थित करत पालकमंत्री व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पालिका यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांचे स्पष्टीकरण पालिका अधिकाऱ्यांकडे मागितले.  सर्वपक्षीय नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतानाच पालिका अधिकाऱ्यांना जाबही पालकमंत्री दादा भुसे यांनी विचारला. यावर या वास्तू निर्माणाच्या अखेरच्या टप्प्यात असून लवकरच त्यांची कामे पूर्ण होतील, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींना दिले.

शहरात रस्तोरस्ती आढळले कचऱ्याचे ढीगवसईत बैठकीला येत असताना शहरात रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग दिसल्याचे निरीक्षण पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नोंदवले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अमृत योजनेच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यावरही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. याच अनुषंगाने अनधिकृत नळ कनेक्शन आणि अनधिकृत बांधकामे, पावसाळ्यात शहरात तुंबणारे पाणी हे प्रश्नही बैठकीत चर्चेला आले. या बैठकीत महापालिकेच्या निर्माणाधीन नवीन वास्तू, हॉस्पिटल्स, नाट्यगृह आणि अन्य विकासकामांवरही साधक-बाधक चर्चा झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतानाच पालिका अधिकाऱ्यांना जाबही पालकमंत्री दादा भुसे यांनी विचारला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार