शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:51 IST

भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे.

- सुनील घरत पारोळ - भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. यामुळे आजही मोठ्या जनजीवनाला यातनामय जीवन जगावे लागत आहे. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे.या ठिकाणच्या ग्रामस्थांना समुद्रातून बोटीने प्रवास करून शहरात यावे लागते. संध्याकाळी ७ नंतर बोट बंद होत असल्याने किल्ल्याबाहेर पडताना नागरिकांना वेळेचे भान ठेवावे लागते. अन्यथा पूर्ण रात्र किनारपट्टीवर घालवण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. अर्नाळा किल्लावासीयांसाठी मागील ४ वर्षांपासून समुद्रीमार्गे जेट्टी (पूल) बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धूपप्रतिबंधक बंधारा बांधून मंजूर होऊन काम सुरूदेखील करण्यात आले आहे. पण काम संथगतीने सुरू असल्याने पुढील वर्षीच्या पावसाळ्यात येथील आणखी २० ते २५ घरे समुद्र गिळंकृत करण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.माजी खासदार तथा माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी अर्नाळा किल्ला परिसरात असलेले काळोखाचे साम्राज्य पूर्णपणे नाहीसे करून विजेची सोय उपलब्ध करून दिली. त्याआधी बेरोजगारी आणि अज्ञानाच्या दरीत खितपत पडलेला अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण वर्ग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबतीत प्रगती करू लागला आहे. वसई तालुक्यात होणारे महोत्सव, तरुणांना चालना देणारे उपक्रम या सर्वांत अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण-तरुणी हिरिरीने सहभाग घेऊन अर्नाळा किल्ला परिसराचे नाव उज्ज्वल करू लागले आहेत. मात्र अर्नाळा किल्ला परिसरातून बाहेरच्या जगात पाय ठेवताना येथील ग्रामस्थांना वेळेचे भान ठेवावे लागत आहे. संध्याकाळी सातनंतर अर्नाळा किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर बोटीअभावी नागरिकांना किनाऱ्यावरच थांबावे  लागते. दरम्यान, येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकामही संथगतीने सुरू असल्यानेच नागरिकांच्या घरांची दरवर्षी पडझड होते, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार