शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या अवयवदानातून दोघांना जीवदान!

By admin | Updated: June 22, 2014 18:47 IST

‘मला तिचे अवयव दान करायचे आहे’, अशी इच्छा आईने अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयामुळे दोनजणांना जीवनदान मिळाले आहे.

मुंबई : एकुलत्या एक मुलीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर मोठय़ा धीराने ‘मला तिचे अवयव दान करायचे आहे’, अशी इच्छा आईने अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयामुळे दोनजणांना जीवनदान मिळाले आहे. 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आणि मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांची कन्या हेमांगी हिचा मृत्यू झाला. हेमांगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. तिला अचानक तीव्र डोकेदुखीचा त्रस जाणवू लागला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हेमांगी कोमात गेली. 
तिच्या मेंदूत रक्तस्त्रव झाला होता. दुस:या दिवशी डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. तिच्या सर्व अवयवांचे कार्य सुरू होते, म्हणूनच सामंत -प्रभावळकर यांनी तिच्या यकृत, किडनी, डोळे या अवयवाचे दान करायचे ठरवले. असे करून त्यांनी एक नवीन आर्दश समाजासमोर ठेवला आहे. हेमांगीचे यकृत एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला देण्यात आले असून किडनी 38 वर्षीय व्यक्तीला देण्यात आली आहे. 
हेमांगी अभ्यासात खूप हुशार होती. महिलांवर होणा:या अत्याचारासंदर्भात आणि इतर विषयासंदर्भात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय माहिती, आकडेवारी हवी असल्यास तीच मला इंट2रनेटवरून माहिती काढून द्यायची. 5 जून रोजी मी रात्री घरी येताना तिला आवडते म्हणून सॅण्डवीच घेऊन आले होते. तिने खाल्ले. थोडय़ा वेळाने म्हणाली, माङया डोक्याच्या मागच्या बाजूला दुखते आहे. तिला उलटय़ा झाल्या. मध्यरात्रीच तिला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात 
आले. तिच्या चाचण्या करण्यात आल्या. 
यावेळी मेंदूमध्ये रक्तस्त्रव होत असल्याचे समजले. यानंतर ती कोमात गेली. यानंतर तिला ब्रेनडेड घोषित केले. जगात यावर काहीच उपचार नसल्याचे सांगितले. मग तिला अवयव रूपात जिवंत ठेवायचे ठरवले आणि तिच्या अवयवांचे दान केले, असे सामंत-प्रभावळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
अवयव दान हेच खरे श्रेष्ठ दान 
च्अवयव दान हेच खरे श्रेष्ठ दान आहे. माङया मुलींच्या अवयवाचे दान केल्यामुळे तीन गरजूंना त्याची मदत मिळाली आहे. त्यांना माङया मुलीच्या अवयवांमुळे जीवनदान मिळाले आहे. यापुढेही अवयव दानाची चळवळ उभी करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना  निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी सांगितले.