शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सिमल्यातून पळवलेल्या मुली बोईसरला सापडल्या

By admin | Updated: December 27, 2016 02:25 IST

शिमल्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींसह एक मुलगा पालघरच्या गुन्हे शाखेला सापडला असून,त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

विरार : शिमल्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींसह एक मुलगा पालघरच्या गुन्हे शाखेला सापडला असून,त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.पेट्रोलींग करीत असताना पालघरच्या बोईसर युनीटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या स्टाफला भाजी मार्केट परिसरात दोन मुली आणि एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता,हिमाचल प्रदेशातील सिमला येथील असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,याबाबत ठोस स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही. त्यामुळे ठाकूर यांनी सिमला पोलीसांशी संपर्क साधला असता, लोअरबाजार सिमला येथील गोपाल शर्मा यांची मुलगी मीनाक्षी, तीची मैत्रीण प्रीती आणि मित्र उदित यांचे अपहरण झाले असल्याची माहिती त्यांना मिळाली. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख पटवल्यानंतर सिमला पोलिसांनी या तिघांच्याही पालकांशी संपर्क साधून त्यांची खुशाली कळवली.या तिघांनाही ताब्यात घेण्यासाठी सिमला पोलीस बोईसरला निघाले असून, बोईसर पोलीसांनी तिघांचीही वैद्यकिय तपासणी करून ते येईपर्यंत त्यांना बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र ठाकूर, उपनिरिक्षक निवास कणसे, हवालदार मंगेश चव्हाण,पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी, सचिन मर्दे, नरेश जनाठे यांनी हे यशस्वी तपासकार्य केले. (वार्ताहर)