नालासोपार्‍यात दोन गटात गॅंगवॉर? पूर्ववैमन्यसातून तरूणाची रस्त्यात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 20:34 IST2026-02-21T20:32:22+5:302026-02-21T20:34:22+5:30

याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 

Gang war between two groups in Nalasopara Youth killed on the road due to past enmity | नालासोपार्‍यात दोन गटात गॅंगवॉर? पूर्ववैमन्यसातून तरूणाची रस्त्यात हत्या

नालासोपार्‍यात दोन गटात गॅंगवॉर? पूर्ववैमन्यसातून तरूणाची रस्त्यात हत्या

 

नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील गटातील वादाने हिंसक वळण घेतले आहे. पूर्ववैमन्यसाततून एका तरूणाची ७ चते ८ जणांनी भर वर्दळीच्या रस्त्यात शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या कऱण्यात आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 

मयत शुभम मिश्रा (३१) हा नालासोपारा पूर्वेच्या गाला नगर येथील वैष्णवी हेरिटेज या इमारतीत रहात होता. मिश्रा याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वी तो तडिपार होता. काही महिन्यांपूर्वीच तो तडिपारीची शिक्षा भोगून नालासोपार्‍यात आला होता. मयत शुभम मिश्रा याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याला ७ महिन्यांचा मुलगा आहे. 

शुक्रवारी रात्री तो अंकित पांडे, रोशन सिंग, अंबुज पांडे, सनी तिवारी या मित्रांसोबत नालासोपारा पूर्वेच्या निधिशा बार मध्ये मद्यपान करत बसला होता. त्यावेळी शुभमचा रोशन सिंग सोबत वाद झाला. मिश्रा याने रोशन सिंग याच्याविरोधात तक्रार केली होती. त्याचे निमित्त होऊन हा वाद झाला होता. मित्रांनी त्यांचा वाद सोडवला. त्यानंतर  टिंकल मिश्रा याने त्यांना भेटायला बोलावले. 

नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम मिश्राला मारण्यासाठी विरोधी गटाने हा कट रचला होता. त्यानुसार अंकित पांडे आणि शुभम मिश्रा हे दोघे रिक्षातून जायला निघाले. मात्र रात्री साडेअकरा वाजता नालासोपारा पश्चिमेच्या पंचमुखी हनुमान मंदिरासमोर सिगारेट पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवण्यात आली. अचानक रोशन सिंग आणि त्याचे साथीदार जगन महेंडी, सुनिल मालुसरे उर्फ बिक्शो, सुरज कबाडिया दुचाकीने आले. सुनिल मालुसरे याने चाकूने शुभम मिश्रावर वार केले. अन्य साथीदारांना शुभमला खाली पाडून दगडानी शुभमच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरिरावर मारहाण केली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मध्यरात्री मृत्यू झाला. 

या प्रकऱणी नालासोपारा पोलीस ठाण्यात रोशन सिंग, जगन मेहंडी, सुनिल मालुसरे उर्फ बिक्शो, सुरज सिंग उर्फ कबाटे, टिंकल मिश्रा तसेच अन्य ४ ते ५ जणांविरोधात हत्या, संगनमत करून कट रटणे, बेकायदेशीर जमाव करणे, शसस्त्र हल्ला कऱणे, दंगल घडवणे याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ६१ (२), १८९ (२), १८९ (४), १९१ (१), १९१ (३), ३५२, ३५१ (३), ३७ (१), ३७ (३) तसेच शस्त्रास्त अधिनियमाच्या कलम ४ आणि २५ अन्यवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही हत्या कट रचून करण्यात आली आहे. याप्रकऱणी आम्ही एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. - पौर्णिमा चौगुले-श्रींगी, (प्रभारी उपायुक्त, परिमंडळ ३)

Web Title : नालासोपारा में गैंगवार? पुरानी दुश्मनी में युवक की हत्या।

Web Summary : नालासोपारा में पुरानी दुश्मनी के चलते 31 वर्षीय शुभम मिश्रा की बेरहमी से हत्या कर दी गई। 7-8 लोगों के समूह ने चाकू और पत्थरों से हमला किया। पुलिस मामले की जांच कर रही है और फरार आरोपियों की तलाश जारी है।

Web Title : Gang war in Nalasopara? Youth murdered over old rivalry.

Web Summary : In Nalasopara, a 31-year-old man, Shubham Mishra, was brutally murdered due to past animosity. He was attacked with knives and stones by a group of 7-8 people. Police are investigating the incident and searching for the absconding accused.