वाड्यात माथाडींचे बेमुदत उपोषण

By Admin | Updated: January 13, 2016 00:21 IST2016-01-13T00:21:38+5:302016-01-13T00:21:38+5:30

वाडा तालुक्यातील वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिप्सन या कंपनीतील माथाडींना कायम स्वरूपाची कामे देण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने माथाडी

Free upheaval of Mathadi in the castle | वाड्यात माथाडींचे बेमुदत उपोषण

वाड्यात माथाडींचे बेमुदत उपोषण

वाडा : वाडा तालुक्यातील वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिप्सन या कंपनीतील माथाडींना कायम स्वरूपाची कामे देण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने माथाडी कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्दारासमोर सोमवार ( दि. ११ ) पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
दत्तात्रेय कोल्हटकर, संतोष जाधव, परमेश्वर कोळेकर, संदीप मेंगडे, किसन बंडगर व अशोक दळवी या माथाडी कामगारांनी कालपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर ८७ कामगारांनी साखळी पद्धतीने त्यांना पाठिंबा देत आहेत.
'जिप्सन' कंपनीत पीओपी शीट व पावडर यांचे उत्पादन केले जाते. या कंपनीत भराई, उतराई, वाराई, थापी, इत्यादी माथाडी स्वरूपाचे कामे करण्यासाठी माल वाहतूक कामगार मंडळाने टोळी नंबर १२०५ व २३६९ मधील कामगारांना नेमले आहे. यात सुमारे ८७ कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. मात्र कंपनी प्रशासनाने त्यांना अचानक काम देणे बंद केले. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, माथाडी कामगारांच्या उपोषणाची दखल प्रशासनाने तत्काळ न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना नेते जनार्दन भेरे यांनी प्रशासनाला दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Free upheaval of Mathadi in the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.