शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने उलटूनही रस्ता अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:31 IST

नागरिक त्रस्त : सुरक्षेच्या उपाययोजनांकडेही पालिकेचे दुर्लक्ष

अंबरनाथ : पूर्व भागातील साई सेक्शन भागात काँक्रिटीकरणासाठी रस्ता बंद करून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी स्थानिकांच्या तक्रारी वाढत असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्त्याचे काम अर्धवट असून तेथे सुरक्षेची उपाययोजनाही केलेली नाही.

अंबरनाथ पूर्व भागातील कानसई या रहिवासी परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली होती. एकीकडे रस्त्यांची दुर्दशा असताना येथे भुयारी गटारांचे कामही करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते चालण्यायोग्यही राहिलेले नाहीत. नगरपालिकेने साई सेक्शन परिसरातील काही रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चार महिन्यांपासून सुरू केले आहे. या रस्त्यांच्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या भागातील रस्त्यांचे नियोजनही गुंतागुंतीचे असून एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ते दूर आहेत. ज्या रस्त्यांचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे, त्या कामांबाबत नगरपालिकेच्या अभियंत्यांसह ठेकेदाराने कुठलेही नियोजन केलेले नाही.

या भागात काही रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे, तर काहींचे काम एका बाजूने पूर्ण झाले आहे. दोन भागांतील रस्ते एकमेकांना अद्याप जोडण्यात आलेले नाहीत. एका ठिकाणी चार रस्ते येणाºया भागात रस्त्यांची जोडणी करण्यात ठेकेदाराला विसर पडला आहे. तसेच एकीकडे रस्ता पूर्ण झाला असल्याचे दिसत असले, तरी दुसºया टोकाला रस्ता अपूर्णावस्थेत आहे. तसेच या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी नगरपालिका आणि रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराने काम सुरू असल्याचा फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री येथे वाहन घेऊ न येणाºया वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

या भागात अनेक हॉस्पिटल असल्याने येथे येणाºया रुग्णांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. तसेच काम सुरू असलेले रस्ते अरुंद असल्याने अर्धवट रस्ता गाठल्यानंतर मागे फिरताना वाहनचालकांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करत सिमेंटचे रस्ते तयार करताना या कामात नियोजनाचा अभाव असून ठेकेदारावर नगरपालिका अभियंत्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अर्धवट आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांची अडचण होत असून नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.रस्तेकामांची पाहणी करण्याचे आदेशरस्त्यांचे आणि कामाचे नियोजन नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे. तर, यासंदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांनी रस्त्याच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना पाहणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षा