शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पहिला राष्ट्रध्वज ३३ गडांवर फडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:28 IST

पालघर जिल्ह्यातील ३३ किल्ल्यांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास दुर्गमित्र मानवंदना देणार आहेत. दोन दिवस चालणाºया या मोहिमेची सुरुवात येत्या शनिवारी वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकातून करण्यात येणार आहे.

शशी करपे वसई : पालघर जिल्ह्यातील ३३ किल्ल्यांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास दुर्गमित्र मानवंदना देणार आहेत. दोन दिवस चालणाºया या मोहिमेची सुरुवात येत्या शनिवारी वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकातून करण्यात येणार आहे.किल्ले वसई मोहिम परिवाराने भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाच्या स्मृती जपण्यासाठी व त्याला मानवंदना देण्याची मोहिम २००७ सालापासून सुरु केली आहे. यंदा यंदा त्याला ११० वर्षे पूर्ण होत आहे.वसई किल्ला, अर्नाळा किल्ला, वज्रगड, आगाशी कोट, मांडवी कोट, तुंगार दुर्ग, दहिसर कोट, घोडबंदर कोट, पारगाव कोट, विराथन कोट, दातिवरे बुरुज, हिरा डोंगरी दुर्ग, कोरे कोट, एडवण कोट, मथाणे कोट, भवानीगड, दांडा कोट, कित्तल कोट, केळवे कोट, तारापूर किल्ला, डहाणू किल्ल्यांवर त्याचा जयजयकार होईल. ३३ गडकोटांच्या प्रत्यक्ष भेटीच्या निमित्ताने त्या गडकोटांच्या प्राचीन व ऐतिहासिक इतिहासाला साद घालण्याची संधी दुर्ग प्रेमींना मिळणार आहे. दोन दिवसांच्या मोहिमेत इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत मार्गदर्शन करणार आहेत.जगातील सर्व राष्ट्रांचे स्वत:चे राष्ट्र्ध्वज असून त्यांना जनमानसात स्वतंत्र मान आणि आदर आहे. भारतीयांनी ध्वज ही संकल्पना राबवली त्यावेळी तिरंगा ध्वज नव्हता. त्याला एका शतकापूर्वीची पार्श्वभूमी आहे.२२ आॅगस्ट १९०७ रोजी जर्मनमधील स्टुटगार्ट शहरात जागतिक समाजवादी परिषद भरली होती. त्यावेळी भारताच्या प्रतिनिधी म्हणून मादाम कामा हजर होत्या. मादम कामांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र ध्वज भारताचा म्हणून सादर केला.मादाम कामा यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत फडकवलेला ध्वज आद्य राष्ट्रध्वज मानला जातो. आॅगस्ट १९३७ मध्ये या ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात पोचल्यानंतर राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढण्यात आली होती. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्टेशन मार्गावर निघालेल्या मिरवणुकीत स्वातंत्र्यवीर सावकरही सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात सावकरांचे योगदान होते. आजही हा ध्वज पुण्यात केसरीवाड्यात ठेवण्यात आलेला आहे.