शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पहिले पुस्तक कायम स्मरणात राहते!

By admin | Updated: April 2, 2016 02:57 IST

काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम

वसई : काळजात कायम साठवून ठेवावा, असा माणसाच्या आयुष्यातला गंध कुठला असावा, तर तो असतो कोऱ्याकागदाचा वास. पुस्तक बालवयात पहिल्यांदा आपल्या हाती पडते, तेव्हा प्रथम तो गंध आपल्याला भेटतो आणि जगभरातल्या सर्व प्रकारच्या प्रदूषणांनंतरही आपण तो गंध कधीही विसरत नाही. माणूस सर्वकाही विसरून जातो, पण ज्या दिवशी हातात नवंकोरं पुस्तक आलेलं होतं, तो दिवस आपल्या कायमच स्मरणात राहिलेला असतो. ओल्या मातीचा गंध आणि नव्याकोऱ्या पुस्तकाचा गंध आपल्या स्मरणकुपीत कायमच एकत्र वास करीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवसाच्या निमित्ताने वसईतील बालसाहित्यिक व कवी सायमन मार्टिन यांनी लोकमतशी संवाद साधताना वाचनाची महती सांगितली.पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून जिवंत झाडाचं कलेवर असते. आपलं सर्वस्व देऊन झाड पुस्तकाच्या रूपाने आपल्याला भेटायला आलेलं असतं. त्यात झाडाचा आत्मा असतो. जेव्हा पुस्तकाच्या सोबत आपण असतो, तेव्हा आपण झाडाच्या सावलीतच असतो. बालपणी रंगीबेरंगी चित्रांनी नटलेली जी पुस्तकं भेटलेली असतात, ती आपण कशी विसरू शकतो? पुस्तकावाचून कुणाचंही बालपण जाऊ नये, पण जगभरात अशी असंख्य छोटी मुलं असतात की, ज्यांच्या भाग्यात नवीन कोऱ्या पुस्तकांचा सहवासच नसतो. त्यामुळे त्यांचं बालपण एकतर खुरटून गेलेलं असतं किंवा करपून गेलेलं असतं, असेही त्यांनी सांगितले.छोट्या मुलांची शाळा भरलेली आहे आणि गरिबीमुळे शाळेची पायरी चढू न शकलेली मुलं आशाळभूतपणे त्या शाळेच्या इमारतीकडे व शाळेत जाणाऱ्या मुलांकडे पाहत आहेत, असं चित्र आपण अनेकदा पाहिलं असेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे यापुढचं सर्व शिक्षण पुस्तकांशिवाय होऊ लागलंय. त्याचे फायदे-तोटे असू शकतात, पण पुस्तकाचा स्पर्श, रूप, रंग, गंध आणि सहवास मुलांना माणूस म्हणून घडवण्यासाठी अत्यावश्यक असतो. समाजातला ओलावा संपून जातो तेव्हा मुलांचा विचार बाजूला पडतो, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) सर्व प्रयत्न करून छोट्याचं भावविश्व समृद्ध करणारी अगणित पुस्तकं छापली जायला हवीत, ती त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवीत. गावागावांत बालवाचनालयं हवीत. त्यासाठी तरतूद हवी. उत्तम रस्ते, सुंदर घरं होत राहतील, पण बालमनावर संस्कार करणारी पुस्तकं नसतील तर बाप हो, विनाशाकडे आपण कायम प्रवास करीत राहू. - सायमन मार्टिन, कवी-साहित्यिक