शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

सुरूंच्या बनाला आग लावली?

By admin | Updated: April 11, 2016 01:11 IST

वन विभागांतर्गत नरपड आणि चिखले या समुद्रकिनाऱ्यालगतच्या सुरूंच्या बागेला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली.

डहाणू/बोर्डी : वन विभागांतर्गत नरपड आणि चिखले या समुद्रकिनाऱ्यालगतच्या सुरूंच्या बागेला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. ती लागली की लावली याबद्दल संशय व्यक्त होतो आहे. डहाणू व बोर्डी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व अकार्यक्षमतेमुळे सुरूच्या बागांना, धोका पोहचत असल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी आहे. जोरदार वारे आणि भरतीच्या लाटांच्या तडाख्यापासून किनाऱ्याची धूप नियंत्रित करण्यासाठी वन विभागाने सुरू झाडांची लागवड केली आहे. धूप प्रतिबंधासह या गर्द हिरव्या सुरू बागांनी परिसर नयनरम्य बनला असून तो पर्यटकांना भुरळ घालत आहे. मात्र काही अविवेकी पर्यटक आणि मद्यपी यांनी गैरवर्तनाने सुरूंच्या बागांना आग लागण्याचे प्रसंग उद्भवून झाडांचे नुकसान होत आहे. तर कचरा, प्लॅस्टिक पिशव्या व मद्याच्या बाटल्यांमुळे परिसर बकाल बनला आहे. कुठेही शेकोट्या पेटविणे, कचऱ्याचे ढिग जमावणे, ते जाळणे यामुळे या आगी लागत आहेत. तसेच जैवविविधता आणि परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)