शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धोडींच्या कुटुंबीयांना मिळाले चार लाख

By admin | Updated: October 7, 2016 04:35 IST

गेल्यावर्षी वाहत्या नाल्यात पडून बोईसर राणी शिगाव येथील सुभाष धोडी यांचा मृत्यू झाला तरी प्रशासकीय गफलतीमुळे त्यांना नाकारली गेलेली चार लाखांची भरपाई

पालघर : गेल्यावर्षी वाहत्या नाल्यात पडून बोईसर राणी शिगाव येथील सुभाष धोडी यांचा मृत्यू झाला तरी प्रशासकीय गफलतीमुळे त्यांना नाकारली गेलेली चार लाखांची भरपाई तहसीलदार महेश सागर यांच्या पाठपुरव्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. सुभाष हे कामानिमित्त २७ जून २०१६ रोजी बाहेर पडल्यानंतर जोरदार सुरु झालेल्या पावसामुळे एका नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. ते बेपत्ता झाल्याची नोंद त्यांची पत्नी लता धोडी ह्यांनी बोईसर पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली होती.सुभाष धोडी ह्यांचा मृतदेह ३० जून रोजी सापडल्या नंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.नैसिर्गक आपत्तीत शासनाच्या वतीने मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानासाठी संबंधित तलाठ्यांनी पंचनामा करून सुभाष धोडी यांचे प्रकरण पालघरचे तत्कालीन तहसीलदारा कडे पाठविले होते.मात्र त्यांनी त्यांचा मृतदेह सापडला त्यादिवशी (३० जून) पाऊस पडला नसल्याचा शेरा मारून सानुग्रह अनुदान देता येणार नसल्याचे कळविले होते. त्यामुळे घरातल्या कमावत्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर मोठे संकट ओढवले असतांना शासनाकडून मिळणारी भरपाईदेखील नाकारण्यात आल्याने धोडी कुटुंबावर दुहेरी संकट ओढवले होते. हेच प्रकरण विद्यमान तहसीलदार महेश सागर यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी कागदपत्रे चाळली असता सुभाष ज्या दिवशी नाल्यात पडून वाहून गेले त्यादिवशी ११५ मिलीमीटर पावसाची नोंद असल्याने व शासकीय परिपत्रकातील अटी शर्ती नुसार धोडी कुटुंबाला भरपाई मिळणे त्यांचा अधिकार असल्याचे आढळून आले. त्यांनी ते प्रकरण संमत केले आणि मंगळवारी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते सुभाष यांच्या पत्नी लता धोडी यांना ४ लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार खटके उपस्थित होते. (वार्ताहर)